Nashik Rain: जूनमध्ये गोदावरी दुसऱ्यांदा खळाळली

Monsoon Alert: गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम पट्ट्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी झाली तर संततदार सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढती आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सोमवारी (ता. २३) रोजी सायंकाळी ६ वाजता विसर्ग ६,१६० क्युसेक करण्यात आला होता.
Nashik Rain
Nashik RainAgrowon
Published on
Updated on

Nashik News: गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम पट्ट्यातील त्रंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी झाली तर संततदार सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढती आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सोमवारी (ता. २३) रोजी सायंकाळी ६ वाजता विसर्ग ६,१६० क्युसेक करण्यात आला होता.

त्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या अंतराने जून महिन्यातच गोदावरी नदी दुसऱ्यांदा खळाळली.पाणलोट क्षेत्रात पावसाची संततदार सुरू असल्याने गंगापूर, दारणा व कडवा या धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला आहे.

Nashik Rain
Monsoon Alert: विदर्भासह राज्यात पाऊस शक्य; कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

त्यामुळे धरण परिचालन सूचीनुसार पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी अधिक करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वच महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे गंगापूर धरणातून सोमवारी (ता. २३) दुपारी दोनपर्यंत ३,९४४ क्युसेक इतका होता.

Nashik Rain
Nashik Rain : येवल्याच्या पूर्व भागात पावसाने दणादाण

मात्र पाण्याची आवक वाढल्याने तो २,२१६ क्युसेकने वाढवून दुपारी २ पासून ६,१६० क्युसेक इतका सुरू होता. आता पावसाचा जोर ओसरल्याने मंगळवारी (ता. २४) दुपारी १,७६० क्युसेकने कमी करून ४,४०० क्युसेक सुरू होता.

गेल्या रविवारी (ता. २२) दारणा धरणातून ४,७४२ क्युसेक विसर्ग सुरू होता. दुपारी १२ वाजता तो कमी करून ४,०७९ क्युसेक सुरू होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी (ता. २३) रात्री १० वाजता ६६३ क्युसेकने वाढ केल्याने ४,७४२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com