Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Shahu Market Yard : डुकरांचा वावर वाढल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेतही व्यापाऱ्यांनी चोरी व डुकरांना आळा घालण्याची मागणी केली होती.
Kolhapur market committee
Kolhapur market committeeagrowon
Published on
Updated on

Kolhapur Bajar Samiti : कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचा माल साठणुकीवर मोठी प्रश्न उपस्थित आहे. मागच्या महिन्याभरात पाच ते सात ठिकाणी चोऱ्या झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर डुकरांचा वावर वाढल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेतही व्यापाऱ्यांनी चोरी व डुकरांना आळा घालण्याची मागणी केली होती.

शाहू मार्केट यार्डात आत बाहेर करण्यासाठी पूर्वी आठ ठिकाणी फाटक होते. दरम्यान मागच्या ७ वर्षांपूर्वी पूर्व आणि पश्चिमेकडे असे दोनच गेट करण्यात आले आहेत. या दोनच मार्गांवर जास्त वर्दळ असते. बाजूच्या गूळ सौद्याच्या सहा गल्ल्यांपैकी चार गल्ल्यांत वर्दळ नसते. वर्दळ नसलेल्याचा अनेक संशयित लोक याठिकाणी वावरत असतात. त्यासोबत चिवा काठी बाजारामागील भागातून काही संशयित विशेषतः नशेबाज वावरत असतात.

बाजारपेठेतील वर्दळ शांत झाल्यानंतर कांदा कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने गोदाम, पेढीतून लहान मोठ्या साहित्यांची वारंवार चोरीच्या घटना घडत असतात. कधी धान्य पिशव्यांची तर टोचा मारून धान्य पोत्यांना प्लॅस्टीक पिशव्यातून चोरी करणे. गूळ रवे, कांदा, लसूण पिशवी पळवणे असे प्रकार घडतात.

किरकोळ चोरी म्हणून तक्रार दाखल करण्याकडे व्यापारीही लक्ष देत नाहीत. बाजार समितीचे सुरक्षारक्षक ठराविक भागात गस्त घालतात. काही सुरक्षारक्षक निवृत्त झाल्याने त्यांची संख्या कमी झाली. परिणामी काही भागांत सुरक्षाच नसते, तेथे चोरीचे प्रकार घडतात. यार्डातील सर्वच भागांत बाजार शेतीमालाचा कचरा पडतो. दुसऱ्या दिवशी हा कचरा उठाव होऊपर्यंत डुकरांसाठी बक्कळ खाद्य उपलब्ध होते.

Kolhapur market committee
Onion Market : कांद्याला चांगला भाव तरिही शेतकऱ्यांच्या हातात पंधरा दिवसांनी पैसे

मिनी बाजारात भाजीपाला विक्री होते. तेथेच सर्वाधिक प्रमाणात डुकरे फिरताना दिसतात. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना आहे त्या स्थितीत बाजार खरेदी करण्याची वेळ येते. यावेळी काही ग्राहकांना किळसवाण्या प्रकारांना सामोरे जाण्याचीही वेळ आली आहे. परिणामी, भाजी खरेदी टाळली जाते. येथील व्यावसायिकांचे नुकसान होते.

बाजार समितीवरील एका प्रशासकाने यार्डात डुकरे दिसल्यास सुरक्षा रक्षकावर कारवाईचा इशारा दिला होता. तेव्हा डुकरांचा सुळसुळाट पूर्ण बंद झाला; मात्र संचालक मंडळाच्या काळात असे आदेश सुरक्षा रक्षकांना नसल्याने डुकरांचा वावर थांबण्याऐवजी वाढल्याचे दिसत आहे.

असा आहे बाजारसमितीचा विस्तार

सध्या बाजारसमितीत ३५ सुरक्षारक्षक आहेत यातले ड्यूटीवर असणारे २० आहेत. समितीत ४४५ खासगी मालमत्ता केंद्र आहेत तर १० तंबाखू गोदामे आहेत. ५१ सरकारी गोदामे, ५ वखार गोदामे, ११ विविध बँका आहेत तर ३ उद्याने आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com