Marathwada Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २१६ मंडलांत पाऊस

Unseasonal Rain Crop Damage : मॉन्सूनोत्तर पाऊस खरिपातील कपाशी पिकासह रब्बीतील मका, ज्वारी, भाजीपालावर्गीय व फळ पिकांचे मोठे नुकसान करतो आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chhatarapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील जोर कमी झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मॉन्सूनोत्तर पावसाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांतील २१६ मंडलांमध्ये शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या जिल्ह्यातील तब्बल ९ मंडलांत अतिवृष्टी झाली.

मॉन्सूनोत्तर पाऊस खरिपातील कपाशी पिकासह रब्बीतील मका, ज्वारी, भाजीपालावर्गीय व फळ पिकांचे मोठे नुकसान करतो आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुन्हा एकदा मॉन्सूनोत्तर पावसाने आक्रमण सुरू केल्याचे दिसले.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी २८.८ मिलिमीटर पाऊस झाला. या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर फुलंब्री व गंगापूर तालुक्यांतील ९ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी ५७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील १५ मंडलांमध्ये ३५.३ ते ७१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

पैठण तालुक्यातील १२ मंडलांमध्ये २० ते ६२.५ मिलिमीटर, गंगापूर तालुक्यातील १२ मंडलांमध्ये ०.८ ते ६७.८ मिलिमीटर, वैजापूर तालुक्यातील १३ मंडलांमध्ये २ ते २४. ५ मिलिमीटर, कन्नड तालुक्यातील ९ पैकी ८ मंडलांमध्ये १.८ ते १०.८ मिलिमीटर, खुलताबादामधील ३ मंडलांमध्ये ८ ते १९ मिलिमीटर, सिल्लोडमधील १० मंडलांमध्ये १४ ते ५५ मिलिमीटर, सोयगाव तालुक्यातील ४ मंडलांमध्ये ४.५ ते ३५.८ मिलिमीटर, तर फुलंब्री तालुक्यातील ५ मंडलांमध्ये ११.५ ते ८०.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.जालना

जालना

जालना जिल्ह्यात सर्व ४९ मंडलांमध्ये सरासरी २७.२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आठ मंडलांत २४.८ ते ५३.३ मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यातील पाच मंडलांत २३.३ ते ४२ मिलिमीटर, जालना तालुक्यातील सर्व ८ मंडलांत २०.५ ते ३६.५ मिलिमीटर, परतूर तालुक्यातील सर्व पाच मंडलांत २.३ ते १५ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यातील सर्व पाच मंडलांत ३३.५ ते ४६.५ मिलिमीटर, घनसावंगी तालुक्यातील सर्व ७ मंडलांत ९ ते ३५ मिलिमीटर, तर मंठा तालुक्यातील सर्व ४ मंडलात ६.५ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. परतूर तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला.

Crop Damage
Crop Damage : सततच्या पावसामुळे पानपिंपरीचा उडाला रंग

बीड

बीड जिल्ह्यातील सर्व ६३ पैकी ५० मंडलांत पावसाची हजेरी तुरळक, हलकी ते मध्यम स्वरूपाची राहीली. बीड तालुक्यातील सर्व ११ मंडलांत ८.३ ते ३८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. पाटोदा तालुक्यातील सर्व ४ मंडलांत १४.३ ते ४० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. आष्टी तालुक्यात सातपैकी ६ मंडलांत १८ ते ३५.३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. गेवराई तालुक्यातील सर्व दहा मंडलांत ११.५ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. माजलगाव तालुक्यातील सहापैकी पाच मंडलांत ०.३ ते ७.५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

केज तालुक्यातील सातपैकी सहा मंडलांत १ तेच २७.५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. धारूरमधील तीनही मंडलात ३ ते ३.३ मिलिमीटर पाऊस झाला. वडवणी तालुक्यातील दोन मंडलांत २.८ ते ६.८ मिलिमीटर पाऊस झाला. शिरूर कासारमधील तीन मंडलांत १५.८ ते २४.५ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. परळी अंबाजोगाईत पावसाचा टिपूसही बरसला नाही.

लातूर

लातूर जिल्ह्यातील सर्व ६१ पैकी १६ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील नऊपैकी एका मंडलात १४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अहमदपूर तालुक्यातील सहापैकी ३ मंडलांत ०.३ ते १० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

निलंगा तालुक्यातील दहापैकी दोन मंडलांत १.३ ते ४.३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. चाकूर तालुक्यातील ६ मंडलांत १ ते १४.५ मिलिमीटर पाऊस झाला. रेणापूर तालुक्यातील ५ पैकी २ मंडलांत ०.३ ते ३.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन पैकी दोन मंडलालांत ०.३ ते १.३ मिलिमीटर पाऊस झाला. जळकोट, देवणी, उदगीर, औसा या तालुक्यांत पावसाची हजेरी लागली नाही.

Crop Damage
Paddy Crop Damage : भोर तालुक्यात पावसात नाचणी, वरईचे नुकसान

धाराशिव

धाराशिवमधील ४२ पैकी १९ मंडलांत तुरळक, हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील भूम तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्यातील पाच मंडलांत ३३.८ ते ५४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. त्यापाठोपाठ परंडा तालुक्यातील ५ मंडलात १९.८ ते ५४.३ मिलिमीटर, कळंबमधील ६ पैकी ५ मंडलांत ०.८ ते २६.३ मिलिमीटर, वाशीमधील तीन मंडलांत २८.८३.८ मिलिमीटर, तर धाराशिव तालुक्यातील ८ पैकी एका मंडलात ०.५ मिलिमीटर पाऊस झाला. उमरगा, लोहारा, तुळजापूरमध्ये पावसाची नोंद झाली नाही.

अतिवृष्टीची मंडळ पाऊस मिलिमीटरमध्ये

छत्रपती संभाजीनगर ७१.५

कांचनवाडी ६९

हरसुल ६९.३

चौका ६९.३

पंढरपूर ६७.८

पिसादेवी ६७.८

वरुडकाजी ६७.८

पीरबावडा ८०.८

वाळूज ६७.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com