
Pune News: मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात देशात खरीप पेरणीने वेग घेतला आहे. यंदाच्या खरीपात ११ जुलैपर्यंत १ हजार ९६ लाख हेक्टरपैकी ५९७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे. तर मागील वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत पेरणी ३७ लाख २७ हजार हेक्टरची आघाडी घेतल्याचं कृषी विभागाने (ता.१४) जाहीर केलं आहे.
तेलबियामध्ये सोयाबीन पिकासह कापसाच्या लागवडीत पिछाडी पाहायला मिळत आहे. कापूस लागवड ९५.२२ वरून कमी होऊन ९२.८३ लाख हेक्टर झाली आहे. म्हणजेच कापूस लागवड २.३९ लाख हेक्टरने गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. तर कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मॉन्सूनच्या चांगल्या सुरुवातीचा फायदाच शेतकऱ्यांनी घेतला असून अनेक भागात लवकर पेरणी झाली आहे. सरकारला डाळी व श्री अन्नावर अधिक भर दिल्यामुळे त्यात मोठी वाढ दिसत आहे.
तेलबियांमध्ये पिछाडी
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातील आकडेवारीनुसार तेलबिया क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मागील वर्षी तेलबिया क्षेत्र या कालावधीत १३९.८२ लाख हेक्टर होतं. यंदा मात्र २.५५ लाख हेक्टरच्या पिछाडीसह १३७.३० लाख हेक्टरवर आहे. तेलबियामध्ये सोयाबीन पेरणी ८.७५ लाख हेक्टरने मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. तर शेंगदाणा लागवडीखालील क्षेत्राने आघाडी घेतली असून तीळ, सूर्यफुलामध्ये आघाडी पाहायला मिळत आहे.
कडधान्यात आघाडी
कडधान्याखालील क्षेत्रात मोठी वाढ असून एकूण पेरणी ५३.३९ वरून ६७.०९ लाख हेक्टरवर गेली आहे. म्हणजेच १३.६९ लाख हेक्टरची वाढ झाली आहे. यामध्ये आघाडी घेत मुगाची पेरणी १०.९६ लाख हेक्टरवर पोहचली आहे. परंतु तुरीच्या क्षेत्रात १.७७ लाख हेक्टर आणि उडीदाच्या पेरणीत ०.०८ ची पिछाडी आहे.
भरडधान्य
भरडधान्यांमध्ये एकत्रित पेरणी क्षेत्र मागील वर्षीच्या ९९.७८ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ११६.३० लाख हेक्टरवर पोहचलं आहे. म्हणजेच १६.५१ लाख हेक्टरीची आघाडी घेतली आहे. बाजरीमध्ये सर्वाधिक १४.४१ लाख हेक्टरची आघाडी असून मका, ज्वारी, नाचणी आणि छोट्या भरडधान्यामध्ये थोडी पिछाडी दिसत आहे.
इतर पिकांची पेरणी?
भात पेरणी १११.८५ लाख हेक्टरवरून १२३.६८ लाख हेक्टर झाली असून ११.८४ लाख हेक्टरची आघाडी नोंदवली गेली आहे. ऊस पिकांत ०२९ लाख हेक्टरची पिछाडी असून क्षेत्र ५५.१६ लाख हेक्टर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.