Raigad Fruit Farming : तीन हजार हेक्‍टरवर फळ लागवड

Orchard Farming : रायगड जिल्ह्यात फळउत्पादनावर भर दिला जात आहे. रोहयोच्या माध्यमातून यंदा तीन हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर विविध फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
Orchard Farming
Orchard FarmingAgrowon
Published on
Updated on

Raigad News : रायगड जिल्ह्यात फळउत्पादनावर भर दिला जात आहे. रोहयोच्या माध्यमातून यंदा तीन हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर विविध फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसोबतच पडीक शेती लागवडीखाली येणार असून वेगवेगळे प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

काही वर्षांपासून जिल्ह्यातील भातशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, महागाईमुळे अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. यामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी २०७ कृषी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Orchard Farming
Orchard Plantation : ‘फुंडकर’ योजनेतून अकराशे हेक्टरवर फळबाग लागवड

लागवडीसाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जाते, ज्यामध्ये पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे ३० व २० टक्‍के अनुदान दिले जाते. योजनेत अल्पभूधारक आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

लाभार्थीचे निकष

इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. अल्प व अत्यल्प लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीस व पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य राहील.

Orchard Farming
Orchard Farming : अंगी नाही बळ, दारी नाही आड, त्याने फळझाड लावू नये

लाभार्थी ऑनलाइन रोजगार कार्डधारक असावा. लाभार्थीस ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायतीच्या कामगार धोरणात त्याचा समावेश असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

पीकनिहाय रोपांची संख्या

आंबा : २,०७,५२१

काजू : ४६,५६३

नारळ : ३५,४८१

इतर फळपिके : ८७,५९६

फळलागवडीचे क्षेत्र हेक्‍टरमध्ये

अलिबाग २१०

पेण २५५

मुरूड १२०

खालापूर १५०

पनवेल १६५

कर्जत ३४५

उरण ९०

रोहा ३३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com