Rahul Gandhi : राहुल यांची शिवाजी पार्कवर सभा

Shivaji Park : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत १७ रोजी होणार असून, मुंबईतील शिवाजी पार्क येथे जंगी सभेचे आयोजन केले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon

Mumbai News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत १७ रोजी होणार असून, मुंबईतील शिवाजी पार्क येथे जंगी सभेचे आयोजन केले आहे. काँग्रेसने मागणी केल्यानंतर आता महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानावरील सभेला परवानगी देण्यात आली आहे.

भारत जोडो न्याय यात्रा १२ रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. या निमित्ताने महाविकास आघाडी लोकसभेच्या प्रचाराचाही नारळ फोडणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बुधवारी (ता. ७) मुंबईत झाली. भारत जोडो न्याय यात्रेत नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.

Rahul Gandhi
PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान सूर्य घर योजनेचे सर्वेक्षण सुरू

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बुधवारी (ता. ७) मुंबईत झाली. भारत जोडो न्याय यात्रेत नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र तो ९ रोजी सुटेल असे संकेत मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अधिकच्या जागांची मागणी केल्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाही. मात्र ९ रोजी अंतिम बैठक होऊन युतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर लगेचच यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ता. १२नंतर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने सर्वच पक्ष जोरात तयारी करत आहेत.

शिवाजी पार्कवरील तयारीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘‘महापुरुषांच्या विचारांना संपवण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजप सरकार करत आहे. भाजप लोकशाही व संविधान संपवायला निघाले आहे, परंतु त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे.’’

Rahul Gandhi
Agriculture Department : ताटकळत ठेवलेल्या उपसंचालकांना बढती

‘‘भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले आहेत. तसेच भाजपला जिंकण्याचा विश्वासही राहिलेला नाही.

राष्ट्रीय नेतृत्व म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळेल की नाही हीच शंका आहे. भाजपच्या पहिल्या यादीत या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव असायला पाहिजे होते, पण नाही. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे व या वर्षी विजयी पताका फडकवू, तसेच सांगलीची जागासुद्धा काँग्रेस लढणार आहे,’’ असेही पटोले म्हणाले.

‘मविआ’ची दिसणार एकजूट

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील सभांची चर्चा आजही सुरू असते. शिवसेनेतील फुटीनंतरही ठाकरे गटाला हे मैदान मिळू नये यासाठी शिंदे गटाने प्रयत्न केले. मात्र फुटीनंतर गेली दोन वर्षे हे मैदान ठाकरे गटाला देण्यात आले होते. आता राहुल गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com