Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीची १२.६२ टक्के पेरणी

Rabi Season : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. १०) ३४ हजार १८२ हेक्टर (१२.६२ टक्के) पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. १०) ३४ हजार १८२ हेक्टर (१२.६२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची १६ हजार ३१९ हेक्टर व ज्वारीच्या १६ हजार ८१४ हेक्टर पेरणीचा समावेश आहे.

ओलाव्याअभावी पेरणी शक्य नसल्यामुळे जिरायती क्षेत्रातील मोठे क्षेत्र अद्याप नापेर आहे. बागायती क्षेत्रातही पाणी कमी पडू लागल्यामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र कमीच राहणार आहे.

Rabi Sowing
Kardai Sowing : करडईची एक हजार १६९ हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५२३.५ मिलिमीटर (६२.४० टक्के) पाऊस झाला असून ३१५.४ मिलिमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. खरिपाची सुगी नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर पेरणीसाठी जमीन तयार करण्यासाठी वेळ लागला.

Rabi Sowing
Rabi Sowing : खानदेशात रब्बी पेरणी रखडत; दिवाळीनंतर वेग शक्य

दरम्यानच्या काळात जिरायती क्षेत्रातील जमिनीतील ओलावा उडून गेला आहे. तेथे आता पेरणी शक्य नाही. सिंचन स्रोतांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड करून शेतकरी पेरणी करत आहेत. वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे जमिनी ओलविण्यासाठी अडचणी येत आहेत.

एकंदरीत यंदाच्या दुष्काळी स्थितीचा रब्बीच्या पेरणी क्षेत्रावर परिणाम होणार आहे. क्षेत्रासह उत्पादकता घटणार आहे. येत्या काळात चारा, अन्नधान्यांची समस्या उद्भभणार आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १०) झालेल्या पेरणीमध्ये रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी १६ हजार ८१४ हेक्टरवर (१४.८७ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ८२२ हेक्टर (२.०९ टक्के) पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com