Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्या यंदा २० टक्क्यांनी पिछाडीवर

Rabi Season : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानंतर देखील रब्बी पीकपेऱ्याची स्थिती फारशी सुधारलेली नाही.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानंतर देखील रब्बी पीकपेऱ्याची स्थिती फारशी सुधारलेली नाही. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाच लाख हेक्टरने पेरण्या कमी झाल्याचे दिसून येते.

कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रब्बीचा पेरा आतापर्यंत ३५.९७ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा ३९.५९ लाख हेक्टरपर्यंत गेला होता.

राज्याचे एकूण सरासरी रब्बी क्षेत्र ५३.९६ लाख हेक्टर इतके आहे. परंतु आतापर्यंत पेरा केवळ ६६.६५ लाख हेक्टरपर्यंत झालेला आहे. रब्बीचे अजून २० ते २४ टक्के क्षेत्र नापेर दिसत आहे. अर्थात, डिसेंबर अखेरपर्यंत काही जिल्ह्यांत पेरा चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामातील अंतिम अहवालात पेरा वाढल्याचे दिसून येईल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बी पेरण्यांनी घेतला वेग

कमी बरसत मॉन्सूनने यंदा राज्याचा खरीप हंगाम धोक्यात आणला. त्यामुळे ४० तालुक्यांना दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. तेथे रब्बी हंगामही संकटात आहे. सुदैवाने गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने रब्बी हंगामाला किंचित दिलासा दिला आहे.

यामुळेच गेल्या हंगामाच्या तुलनेत रब्बी ज्वारीचा पेरा यंदा १०७ टक्के म्हणजेच ११.८८ लाख हेक्टरपर्यंत पोचला आहे. रब्बीतील मुख्य पीक असलेल्या हरभऱ्याचा पेरा सध्या १७ लाख हेक्टरपर्यंत; तर गव्हाचा पेरा ४.३५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीच्या उर्वरित पेरण्या होण्याच्या आशेवर पाणी

पेरा अजून वाढण्याची शक्यता

दरम्यान, पुढील काळात थंडी वाढत गेल्यास रब्बीसाठी पोषक स्थिती तयार होईल. खरिपातील कापूस, सोयाबीन, उसाची काढणी पूर्ण होत असताना त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीनुसार रब्बीचा पेरा केला जात आहे. त्यामुळे पेरा अजून वाढत जाईल, असा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी केला आहे.

रब्बी पेरण्यांची अंदाजे स्थिती (७ डिसेंबरअखेर) (हेक्टरमध्ये)

पीक...सरासरी क्षेत्र...गेल्या वर्षीचा पेरा...चालू वर्षाचा पेरा...टक्के

ज्वारी...१७५३११८...१११२११७...११८८५९०...६७.८०

गहू...१०४८८०७...५४०४५१...४२५१९६...४१.४९

मका...२५८३२१...१८८१९३...१६८१२२...६५.०८

हरभरा...२१५२०१४...२००९४५४...१६९९११२...७८.९५

करडई...२६६५७...२११९९...२९९८७...११२.५०

जवस...१२१४६...२३९९...२६०५...२१.४५

तीळ...१४२९...४२१...४९८...३४.८९

सूर्यफूल...४६८९...१९५३...१००१...२१.३१

इतर तेलबिया...१०७३०...५५९३...५७२२...५३.३३

(टक्क्याचा आकडा गेल्या हंगामातील पेरण्यांच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com