Rabi Sowing : रब्बी पेरण्यांनी घेतला वेग

Rabi Season : गेल्या महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रखडलेल्या रब्बी पेरण्यांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Akola News : गेल्या महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रखडलेल्या रब्बी पेरण्यांना पुन्हा एकदा वेग आला आहे. आतापर्यंत अकोल्यात सुमारे ६२ टक्के तर बुलडाणा जिल्ह्यात १०५ टक्के क्षेत्र लागवडी खाली आले आहे.

यंदा या भागात २६ नोव्हेंबरपासून काही दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिकांचे नुकसानसुद्धा झाले. दुसरीकडे याच पावसामुळे ओल तयार होऊन रब्बी लागवडीला पोषक स्थिती बनली. बुलडाण्यात यंदाही हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ८५ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीची पेरणी सुरूच

जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ४६ हजार हेक्टर आहे. सरासरीच्या १२६ टक्के ही लागवड झाली. तर करडईचे क्षेत्र यंदा वाढले. या पिकाची लागवड दीड हजार हेक्टरपर्यंत पोचली.

रब्बी ज्वारीची १० हजार २२२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली. तसेच गव्हाच्या पेरण्या सध्या होत असून जिल्ह्यात आजवर ३५ हजार ५५० हेक्टरवर लागवड आटोपली होती. तरीही सरासरीच्या ६५ टक्के पेरणी झाली.

अकोल्यात ६१.३८ टक्के क्षेत्रावर पेरणी

जिल्ह्यात रब्बी पिकांची लागवड रखडली होती. या पावसाने दिलासा मिळाला असून आता लागवडीचे क्षेत्र दरदिवसाला वाढत चालले आहे. जिल्ह्यात हरभऱ्याची लागवड ५८ हजार हेक्टरपर्यंत पोचली आहे.

सरासरी क्षेत्र १ लाख ३१० हेक्टर आहे. सरासरीच्या केवळ ६० टक्के ही पेरणी झाली आहे. अद्यापही काही भागात हरभरा लागवड होत आहे. १० ते १५ डिसेंबरपर्यंत हरभरा लागवडीसाठी कमाल मर्यादा आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बी ज्वारीची ७१ टक्के पेरणी

यानंतर पेरणी केल्यास उत्पादकता कमालीची घटते असा कृषी विद्यापीठाकडून सल्ला दिला जातो. गव्हाची लागवड आता १४ हजार २२५ हेक्टरपर्यंत पोचली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र २० हजार ४८७ हेक्टर आहे. गव्हाची आजवर ७१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

गव्हाची लागवड आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याने हे सरासरी क्षेत्र पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २१ हजार हेक्टरच्या तुलनेत ७४ हजार ३३५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. तरीही यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी पर्यंत लागवड पोचू शकेल, या बाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com