
Akola News : संत चोखामेळा प्रकल्पातून नदीत सोडले जाणारे पाणी डाव्या कालव्याद्वारे शिवणी आरमाळच्या लघुप्रकल्पात आणावे, अंढेरा परिसरातील विविध लघू प्रकल्प तुडुंब भरतील अशा स्वरूपाचे नियोजन करावे, यामुळे शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येईल.
यासह इतर मागण्यांसाठी शिवणी आरमाळ परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले असून, १५ डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की लघुप्रकल्पात संत चोखामेळा प्रकल्पातून शिल्लक पाणी आणून सोडल्या गेले, तर हजारो हेक्टर क्षेत्र बारमाही सिंचित होईल.
प्रकल्पातील शिल्लक पाणी जे खडकपूर्णा नदीत सोडले जाते ते डाव्या बाजूच्या कालव्याद्वारे या लघुप्रकल्पात आणून सोडावे. या परिसरात त्यामुळे हरितक्रांती घडून येईल आणि परिसरातील अंढेरा, शिवणी आरमळ, धोत्रा नंदई, सुरा, नागनगाव, पाडली शिंदे, सावखेड नागरे, मेंडगाव, बायगाव, गुंजाळ आसोला, सेवानगर अशा १२ ते १५ गावांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
परिसर सुजलाम् सुफलाम् होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. या प्रमुख मागणीसह शिवणी आरमाळ लघू प्रकल्पाचे नामकरण हे शिवणी आरमाळ या गावाच्या ग्राम दैवत श्री आनंद स्वामी महाराज यांच्या नावावरून शासन दरबारी करण्यात यावे.
तसेच शिवणी आरमाळ लघू प्रकल्पाचे गेल्या ३० वर्षांपासून उखडलेल्या पिचींग दुरुस्तीचे काम करून प्रकल्पावरच्या भिंतीवरील झाडाझुडपांचे निर्मूलन करावे, अशा मागण्या युवा शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे यांच्यासह उमेश आरमाळ, रामप्रसाद पऱ्हाड, दत्ता नागरे, परमेश्वर सोनुने, गणेश आरमाळ, विशाल वायाळ, आंनदा कायंदे, सचिन सोनुने, सुनील पवार, गजानन आरमांळ, दीपक राठोड, योगेश आरमाळ, योगेश आरमाळ आदींनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.