
Shrivardhan News : सध्या शेतीविषयक कामामध्ये मजुरांची कमतरता जाणवत असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे बागायतदारदेखील या समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे अनेकांनी परंपरागत पद्धतींना फाटा देत आधुनिकतेकडे वाटचाल केली आहे.
तालुक्यातील अनेक बागायतदारांनी आता झाडांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुषार सिंचनाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत असून मजुरांच्या टंचाईवरदेखील मात करण्यात येत आहे.
श्रीवर्धन तालुका हा नारळी पोफळीच्या वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. झाडा-माडांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, याकरिता बागायतदार हाताशी गडी घेऊन पारंपरिक पद्धतीने विहिरींच्या माध्यमातून पाण्याची मोटर, पंपाद्वारे पाणी सोडत. येथील जमीन व हवामान नारळी-पोफळींना पोषक आहे.
कसदार, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन, तसेच कडक्याची थंडी अथवा उन्हाळा कोकणात जाणवत नसल्याने वाड्यांमध्ये बाणवली नारळ व रोठा सुपारी लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
अद्यापपर्यंत वाड्यांमधून जलसिंचन हे विहिरीच्या माध्यमातून जलवाहिनी टाकत मोटरद्वारे केली जात आहे. सद्यःस्थितीत वाडीत शिंपण काढण्यासाठी गडी माणूस मिळेनासा झाला आहे.
शिंपण काढणाऱ्यांची टक्केवारी घसरली
आजच्या स्थितीत वाड्यांमधे पारंपरिक पद्धतीने शिंपण काढणाऱ्यांची टक्केवारी ४० टक्के आहे. त्यामुळे बागायतदारांनी आता तुषार सिंचनाचा पर्याया निवडला आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
बागायतदार विहिरीतील पाणी पाण्याच्या पंपाद्वारे मोठ्या टाक्यांमध्ये साठवणूक करतात व नळीद्वारे स्प्रिंकलर हेडच्या माध्यमातून झाडांना पाणी देण्यात येते. यामध्ये अनावश्यक ठिकाणी पडणाऱ्या पाण्यात आंतरपिकांची लागवडदेखील करण्यात येत आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील बागायतदारांनी तुषार सिंचनाचा पर्याय निवडला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.