Marathwada Rabi Crop : मराठवाड्यात २४ लाख ३१ हजार हेक्टरवर रब्बी पिके

Rabi Sowing : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामा आतापर्यंत २४ लाख ३१ हजार ३७१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामा आतापर्यंत २४ लाख ३१ हजार ३७१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत पेरणी झालेल्या ८ लाख ६८ हजार ६४० हेक्टरसह लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील १५ लाख ६२ हजार ७३० हेक्टरवरील रब्बी पिकांच्या समावेश आहे.

खरिपात झालेल्या नुकसानीमुळे यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र वाढण्याचा अंदाज होता. त्यानुसार विलंबाने का होईना रब्बीच्या क्षेत्रात कृषीच्या दोन्ही विभागांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे यंदाच्या रब्बी हंगामासाठी छत्रपती संभाजी नगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर होते.

त्या तुलनेत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन ११७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. दुसरीकडे लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९२९ हेक्टर असताना प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन ११४.५८ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

Rabi Season
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात ९१ टक्के रब्बीचा पेरा

सहा लाख हेक्टरवर ज्वारी

यंदा पुन्हा एकदा मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीची पेरणी झालीच नाही. लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, धाराशिव,नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५६ हेक्टर इतके होते. त्या तुलनेत ९३.३० टक्के म्हणजे ३ लाख ४६ हजार ९२८ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचे सर्व साधारण क्षेत्र ३ लाख २ हजार १३८ असताना प्रत्यक्षात ८९.८४ टक्के म्हणजे २ लाख ७१ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावरच रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

Rabi Season
Rabi Crop Loan : ‘रब्बी’साठी ९९ कोटी ८४ लाख रुपये पीककर्जाचे वाटप

१३ लाख ३८ हजार हेक्टरवर हरभरा

हरभऱ्याची मात्र पुन्हा एकदा सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. आठही जिल्ह्यांत सुमारे १३ लाख ३८ हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेल्या हरभऱ्याच्या क्षेत्रात लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत पेरणी झालेल्या १० लाख २८ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत पेरणी झालेल्या ३ लाख १० हजार ५७० हेक्टर हरभरा क्षेत्राचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागात हरभऱ्याचे सर्व साधारण क्षेत्र २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर, तर लातूर कृषी विभागात ७ लाख ८६ हजार १२३ हेक्टर इतके आहे.

तीन जिल्ह्यांत गव्हाची जास्त पेरणी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना व बीड या तीन जिल्ह्यांत गावाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात १ लाख ९४ हजार ५३८ क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९३ हजार ९७० हेक्टर,जालन्यातील ५६ हजार ४ हेक्टर तर बीड जिल्ह्यात पेरणी झालेल्या ४४ हजार ५६४ गव्हाच्या पिकाचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात १२,७९८ हेक्टरवर, धाराशिवमध्ये २५ हजार ३५१ हेक्टर, नांदेडमध्ये ३५ हजार ६४७ हेक्टर,परभणीत २१ हजार ५५ हेक्टर तर हिंगोली मध्ये २४९१३ हेक्टर अशी एकूण १ लाख २० हजार ३६४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. या पाचही जिल्ह्यात गव्हाचे सर्व साधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com