Rabi Crop Loan : ‘रब्बी’साठी ९९ कोटी ८४ लाख रुपये पीककर्जाचे वाटप

Rabi Season Update : यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात ता.१५ डिसेंबर अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यात १२ हजार ७५६ शेतकऱ्यांना ९९ कोटी ८४ लाख रुपये (१२.७७ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
Rabi Crop Loan
Rabi Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात ता.१५ डिसेंबर अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यात १२ हजार ७५६ शेतकऱ्यांना ९९ कोटी ८४ लाख रुपये (१२.७७ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना मिळून एकूण ७८२ कोटी ३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात व्यापारी बँकांना (राष्ट्रयीकृत बँका) ४४४ कोटी ९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०७ कोटी १६ लाख रुपये, खासगी बँकांना ५७ कोटी ८६ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.

Rabi Crop Loan
Crop Loan : पीक कर्जावरील व्याजदर कमी करा ; खासदार वाजे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहळ यांच्याकडे मागणी

१५ डिसेंबरअखेर राष्ट्रीय बँकांनी ४ हजार ६०२ शेतकऱ्यांना ५२ कोटी ४६ लाख रुपये (११.८१ टक्के), जिल्हा बँकेने ७ हजार २८६ शेतकऱ्यांना ३४ कोटी ४८ लाख रुपये (१९.९४ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ७३० शेतकऱ्यांना ७ कोटी २२ लाख रुपये (६.७४ टक्के), खासगी बँकांनी १३८ शेतकऱ्यांना ५ कोटी ६८ लाख रुपये (९.८२टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

बँकनिहाय रब्बी पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

भारतीय स्टेट बँक २८३.६८ ४४.१५ १५.५६ ३८१७

महाराष्ट्र ग्रामीण बँक १०७.१६ ६.४९ ६.०६ ६६१

जिल्हा सहकारी बँक १७२.९२ ५.२६ ३.०४ ११५६

बँक ऑफ बडोदा ३२.८७ ३.४३ १०.४४ ४०९

Rabi Crop Loan
Crop Loan : नवीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील बळीराजावर जमीनजप्ती, लिलावाची टांगती तलवार

बँक ऑफ इंडिया ५.९४ १.४४ २४.२४ १०३

बँक ऑफ महाराष्ट्रा ४०.४३ १.०३ २.५५ ८१

कॅनरा बँक २३.६४ ०० ०० ००

सेंट्रल बँक ६.०३ ०.३५ ५.८० २९

इंडियन ओव्हरसीज बँक ५.१९ ०.३१ ५.९७ १९

पंजाब नॅशनल बँक ५.४१ ०.६७ १२.३८ ३६

युको बँक ११.७९ ०.४१ ३.४८ ५२

युनियन बँक ऑफ इंडिया १७.०८ ०.६७ ३.९२ ५६

अॅक्सिस बँक ६.२४ ०० ०० ००

एचडीएफसी बँक १९.०८ १.७४ ९.१२ ५९

आयसीआयसीआय बँक १५.१० १.७४ ९.१२ १७४

आयडीबीआय बँक १७.४४ ०० ०० ००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com