
Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे २० लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र यंदाचा रब्बी हंगामात विमा संरक्षित असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
या संदर्भातील अधिक माहितीनुसार, १५ डिसेंबर पर्यंत रब्बी हंगामातील पिकांना विमा संरक्षण घेण्याची मुदत होती. या मुदतीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यात १३ लाख ४७ हजार ६२२ अर्जांच्या माध्यमातून सुमारे ७ लाख ७९ हजार ४६९.१४ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी विमा संरक्षित केले.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ८८५ अर्जाच्या माध्यमातून विमा संरक्षित केलेल्या १ लाख ६८ हजार १५४.८९ हेक्टर क्षेत्रासह जालना जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार ७४ अर्जाच्या माध्यमातून ३ लाख ४ हजार ६३२.४७ हेक्टर तर बीड जिल्ह्यातील ५ लाख ९९ हजार ६७३ अर्जाच्या माध्यमातून ३ लाख ६ हजार ६८१.७८ विमा संरक्षित केलेल्या क्षेत्राचा समावेश आहे.
लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यात १७ लाख ११ हजार १८ अर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १३ लाख ११ हजार ५४५.४५ हेक्टर क्षेत्र विभाग संरक्षित करण्याला पसंती दिली आहे.
यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार ६१५ अर्जाच्या माध्यमातून विमा संरक्षित केलेल्या ३ लाख १४ हजार ४४०.०३ हेक्टर क्षेत्रासह धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार ७३९ अर्जाच्या माध्यमातून विमा संरक्षित केलेल्या २ लाख ३८ हजार ९.१ हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार ५१२
अर्जाच्या माध्यमातून विमा संरक्षित केलेल्या २ लाख ८९ हजार १८३.९६ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील ४ लाख ७१ हजार ४१२ अर्जाच्या माध्यमातून विमा संरक्षित केलेल्या ३ लाख ६५ हजार १५८.८ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ७४० शेतकरी अर्जाच्या माध्यमातून विमा संरक्षित केलेल्या १ लाख ७ हजार ७५३.५६ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.