
Amaravati News : नैसर्गिक आपत्तीपासून होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेस शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ आजचा दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील २७ टक्के क्षेत्रच विमा संरक्षित होऊ शकले आहे.
कृषी विभागाने या योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न चालविले असून, आज अखेर क्षेत्रवाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या योजनेस मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी पीकविमा काढण्याची १५ डिसेंबर ही अखेरची मुदत आहे. गहू, हरभरा व कांदा या पिकासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून केवळ एक रुपया प्रीमियम भरून विमा काढण्याची सवलत देण्यात आली आहे.
मुदत संपण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील २० हजार ६८९ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत झालेल्या प्रत्यक्ष पेरणीखालील क्षेत्राच्या तुलनेत २७ टक्के शेतजमीन विमा संरक्षित झाली आहे.
यंदा रब्बी हंगामात १ लाख ४७ हजार ८१५ हेक्टरमध्ये पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आतापर्यंत १ लाख २१ हजार ७५८ हेक्टरमध्ये पेरणी झाली असून, गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील २० हजार ६८९ शेतकऱ्यांनी एक रुपया प्रीमियम भरून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची ६४७ व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची २७ हजार ५६५, असे एकूण २८ हजार २१२ प्रकरणे दाखल झाली आहेत.
शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद
पीकविमा योजनेस शेतकऱ्यांकडून थंड प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ४६ हजार १४८ शेतकऱ्यांनी सहभाग घेत ४८ टक्के (७६,८२० हेक्टर) क्षेत्र विमा संरक्षित केले होते. यंदा हे प्रमाण केवळ ३३ हजार ९४० (२७ टक्के) आहे. गतवर्षी झालेल्या नुकसानीचे परतावे मिळवताना झालेली कसरत बघता यंदा शेतकऱ्यांची या योजनेतील सहभागाची अनास्था प्रकर्षाने समोर आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.