Rabi Crisis Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी पिकावर संकट; शाळू पिकावर चिकटा आणि माव्याचा प्रादुर्भाव वाढला

Rabi Crop : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या महिन्याभरापासून लहरी हवामानामुळे रब्बी पीक संकटात आले आहे. शाळू पिकावर चिकटा, मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, ही कीड पाने कुरतडत आहे.
Rabi Crisis Kolhapur
Rabi Crisis Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या महिन्याभरापासून लहरी हवामानामुळे रब्बी पीक संकटात आले आहे. शाळू पिकावर चिकटा, मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, ही कीड पाने कुरतडत आहे. जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात शाळू आणि मका पिकाचे जास्त उत्पादन घेतले जाते.

या तालुक्यातील अनेक भागात या समस्येला लोक तोंड देत आहेत. यावर उपाय म्हणून शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक औषधांची फवारणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हातकणंगले तालुक्यात वारणा नदीमुळे अनेक भागात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस पीक घेतले जाते. पाण्याची टंचाई असणाऱ्या भागात रब्बी व खरीप पिके घेतली जातात. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शाळू पिकाची उगवण चांगली झाली आहे. सध्या सर्वत्र शाळूची पिके जोमात आहेत. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिकावर चिकटा पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Rabi Crisis Kolhapur
Kolhapur Sugarcane Season FRP : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एफआरपी जाहीर; शेतकरी संघटनांचा विरोध

कुंभोज गावचे शेतकरी पांडुरंग भानसे म्हणाले, "कधी जादा पाऊस, तर कधी कमी प्रमाणात होत असल्याने शेती करणे अवघड झाले आहे. शेतीची मशागत, खते, बी- बियाणे यासाठी झालेल्या खर्चाइतकेही उत्पन्न निघत नाही". असे त्यांनी सांगितलं

रासायनिक फवारणी

यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग तसेच कडधान्य पीक काढणीच्या वेळी सतत पाऊस पडल्याने पिके कुजून गेली. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बी हंगामातील शाळूची पिके चांगली आहेत. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com