
सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीककर्ज वितरण संथगतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंकेकडूनही कर्ज वितरणात हात आखडता घेतला असून सर्वाधिक राष्ट्रीयकृत, व्यापारी बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. डिसेंबरअखेर जिल्ह्यातील १३ हजार ७४४ शेतकऱ्यांना २२७ कोटी ९५ लाख म्हणजे ११ टक्केच कर्जाचे वितरण झाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे.
जिल्ह्यातील रब्बी हंगामाची पेरणी आटोपली आहे. रब्बी हंगामातील १ लाख २६ हजार ५५ शेतकऱ्यांना कर्ज १२६० कोटी ५५ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका, खासगी आणि ग्रामीण बॅंकाकडून रब्बी कर्ज वितरणास सुरुवात झाली. परंतु मार्चअखेर पर्यंत पीक वितरण केले जाते. नोव्हेंबर अखेर ८ हजार ६५० शेतकऱ्यांना १४८ कोटी ९८ लाखाचे कर्ज वाटप केले.
वास्तविक पाहता, यंदा रब्बी हंगामासाठी कर्ज वितरणास बॅंकेकडून फारशी गती नसल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंक, खासगी आणि ग्रामीण बॅंकाकडून पीक कर्ज वाटपाची टक्केवारी फारच कमी आहे. दरम्यान, राष्ट्रीयकृत, व्यापारी बॅंका दरवर्षी पीक कर्ज वाटपात हात आखडता असतो. परंतु, यंदाच्या रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपास राष्ट्रीयकृत, व्यापारी बॅंकानी कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे.
कर्जवाटप ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल
जानेवारीमध्ये कर्ज वाटपाची आकडेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्पष्ट होईल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात कर्ज वाटप ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. कर्ज वितरणाची मुदत मार्च अखेर आहे. अर्थात, कर्ज वितरणास अडीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक कर्ज ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल असा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केला आहे. मात्र, कर्ज वितरण संथगतीने सुरू असल्याने उद्दिष्ट पूर्ण कसे होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीककर्ज वितरण
बॅंक सभासद संख्या कर्ज वितरण
जिल्हा बॅंक ५५३५ ४७ कोटी ५८ लाख
राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका ७२९३ १४४ कोटी ९३ लाख
खासगी बॅंका ९०४ ३५ कोटी २९ लाख
ग्रामीण बॅंका १२ १५ लाख
एकूण १३४७७ २२७ कोटी ९५ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.