Central Warehousing Corporation : सेंट्रल वेअर हाउसिंग कॉर्पोरेशनतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा

Article by Milind Aakre and Hemant Jagtap : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मार्फत विविध वस्तूंची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक केली जाते. तसेच हाताळणी सेवांमध्ये कृषी उत्पादन, औद्योगिक कच्चा माल आणि नाशिवंत वस्तूंचा समावेश होतो. या माध्यमातून बाँडेड वेअरहाउसिंगच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
Central Warehousing Corporation
Central Warehousing Corporation Agrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC), ‘अ’ दर्जाच्या श्रेणीतील एक शासकीय संस्था आहे. या संस्थेची ‘द वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट, १९६२’ अंतर्गत स्थापना करण्यात आली असून, एक विश्‍वासार्ह, किफायतशीर, मूल्यवर्धित, एकात्मिक वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक सोल्यूशन देणारी संस्था आहे.

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनचे अधिकृत भांडवल आणि एकूण भरलेले भांडवल (एकूण पेड-अप कॅपिटल) अनुक्रमे १०० कोटी रुपये आणि ६८.०२ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये, महामंडळाने मागील वर्षातील २१६८.१३ कोटी रुपयांच्या तुलनेत २२३२.२० कोटींची उलाढाल केली आहे. महामंडळाचा आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये साठवणूक क्षमतेचा सरासरी वापर ८९.५७ टक्के होता. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात हाच साठवणूक क्षमतेचा वापर ८७.०९ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये, सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनने १२७.१२ कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश आणि १४.१३ कोटी रुपयांचा अंतिम लाभांश असा एकूण १४१.२५ कोटी रुपयांचा लाभांश वाटप केला आहे. हे प्रमाण महामंडळाच्या २८२४.९० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीच्या ५ टक्के आहे.

आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ पर्यंत, सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनची १४ क्षेत्रीय कार्यालये आणि ४ विभागीय कार्यालये असून, एकूण ४५८ गोदामांच्या माध्यमातून महामंडळ कामकाज चालवते. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनची एकूण कार्यरत साठवणूक क्षमता १०४.४४ लाख मेट्रिक टन (व्यवस्थापन क्षमता वगळून) असून, यामध्ये २३ कस्टम बॉन्डेड गोदामे, २१ कंटेनरफ्रेट स्टेशन, ०३ खासगी फ्रेट टर्मिनल्स (PFTs), २२ रेल्वेच्या बाजूची गोदामे (RWC's), एक बॅग साठवणूक केंद्र कार्यरत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली येथे चार तापमान नियंत्रित / कोल्ड स्टोअरेज युनिट्स आणि पेट्रापोल येथे एक एकात्मिक चेक पोस्ट (ICP) असून, आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च्या सरासरी क्षमतेच्या ८६.७८ टक्के या सुविधांचा वापर झालेला आहे.

कॉर्पोरेशनकडे १९ राज्य वखार महामंडळामध्ये (SWC) मध्ये ५० टक्के समभाग आहे. कॉर्पोरेशन आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ पर्यंत, या १९ राज्य वखार महामंडळाचे एकूण ५०४.०१ लाख मेट्रिक टन साठवण क्षमतेसह २२०५ गोदामांचे नेटवर्क चालवत आहे. कॉर्पोरेशनची ३१ मार्च २०२३ पर्यंत १९ राज्य वखार महामंडळाच्या इक्विटीमध्ये एकूण ६६.७३ कोटींची गुंतवणूक असून, २०२२-२०२३ या वर्षात, महामंडळाला राज्य वखार महामंडळांकडून लाभांश म्हणून रु. ३८.७४ कोटी प्राप्त झाले आहेत. या राज्य वखार महामंडळामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाना, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, तेलंगाणा या राज्याचा समावेश होतो.

Central Warehousing Corporation
Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा :

साठवूणक :

१) सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मार्फत ४०० हून अधिक वस्तूंसाठी वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक आणि

हाताळणी सेवांमध्ये कृषी उत्पादन, औद्योगिक कच्चा माल आणि नाशिवंत वस्तूंचा समावेश होतो.

२) एकूण ३,६३१ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह भारतातील ४३६ गोदामांच्या नेटवर्कद्वारे नाशिवंत वस्तूंसह २०० हून अधिक वस्तूंसाठी वैज्ञानिक साठवणूक सुविधा देण्यात येते.

३) बंदरे आणि अंतर्देशीय स्थानकांमधील ३० कंटेनर फ्रेट स्टेशनवर आयात आणि निर्यात गोदामाशी संबंधित

सेवा पुरविण्यात येतात.

४) बंधपत्रित गोदाम सुविधा.

आयात आणि निर्यात गोदाम निगडित सेवा :

आपला देश उदयोन्मुख देशांसोबत वाढत्या व्यापाराचा अनुभव घेण्याच्या उंबरठ्यावर असल्याने हा विभाग आयात आणि निर्यात(एक्झिम) पुरवठा साखळीतील सेवा पुरविण्याचे कामकाज करीत आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन (एफडीआय), मेरीटाइम अजेंडा-व्हिजन २०२० द्वारे बंदर क्षेत्राचा विकास, लॉजिस्टिक पार्क आणि फ्री ट्रेड वेअरहाउस झोन (FTWZ) बांधण्यासाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्याच्या धोरणांसह जहाज बांधणीमध्ये गुंतवणूक अशा सरकारी पुढाकाराच्या योजनांचा समावेश आहे. कंटेनर लॉजिस्टिक्स मार्केटला जागा, नियोजित मालमत्ता आणि कमी किमतीत उत्कृष्ट सेवांचा पुरवठा सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मार्फत करण्यात येत आहे.

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ३१ मार्च २०२१ पर्यंत ३९ कस्टम बाँडेड वेअरहाउस चालवत असून बाँडेड वेअरहाउसिंगच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात आले आहे, जेणेकरून उद्योजक आणि निर्यात उदयोन्मुख युनिट्सना त्यांचे कामकाज कमीत कमी गुंतवणुकीत पार पाडणे सोईस्कर होईल.

Central Warehousing Corporation
Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

तीव्र स्पर्धा आणि प्रमुख बंदरांवर कंटेनरच्या ‘डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी’मध्ये वाढ होऊनही, कॉर्पोरेशनने २५ कंटेनर फ्रेट स्टेशन्स (CFSs)/ इनलँड क्लिअरन्स डेपो (ICDs) चालविली आहे. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मार्फत एअर कार्गो कॉम्प्लेक्सचे कामकाज सुद्धा हाताळण्यात येत असून, एक मल्टी-मॉडल ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर म्हणून संपूर्ण सेवा प्रदान करण्याच्या दिशेने कॉर्पोरेशनमार्फत एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

गोवा येथे एक एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC) आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली येथे एक सामान गोदाम (ABW) कॉर्पोरेशन मार्फत चालविण्यात येत आहे.

भारत बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल (पश्‍चिम बंगाल) येथील लँड कस्टम स्टेशन (एलसीएस) बांगलादेशसोबत जमिनीच्या मार्गाने आयात/निर्यात व्यापार सुलभ करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी एकात्मिक चेक पोस्ट (ICP)मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. या सुविधेचे व्यवस्थापन एकात्मिक चेक पोस्ट (ICP), पेट्रापोलला भारतीय लँड पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (LPAI) दीर्घकालीन कामकाजासाठी कॉर्पोरेशनकडे जबाबदारी सोपविली आहे. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात १०० टक्के साठवणूक क्षमतेचा वापर झाला असून, त्यातून २०.५० कोटींची एकूण कमाई झाली आहे.

शेतकरी विस्तार सेवा :

योजनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांमध्ये अन्नधान्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे, सार्वजनिक गोदामांचा वापर करणे आणि गोदामाच्या पावतीवर तारण ठेवून कर्ज मिळविण्यासाठी शेतकरी समुदायाला मदत करणे हा आहे. ही योजना देशभरात २५५ गोदामांद्वारे चालविली जात आहे.

२०२१-२०२२ या वर्षात ५७१६ गावांना भेटी देण्यात आल्या आणि सुमारे २,२९,८४३ शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून, कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

गोदाम (विकास आणि नियमन) कायदा, २००७ आणि ई-निगोशिएबल वेअरहाउस पावती प्रणालीच्या फायद्यांविषयी शेतकऱ्यांना परिचित करण्यासाठी, २० विशेष वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (WDRA) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

कीटक नियंत्रण सेवा :

भारत सरकारने २३ मार्च १९६८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनला त्याच्या गोदामांच्या व्यतिरिक्त कीटक नियंत्रण सेवा हाती घेण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन दर्जेदार कीटक नियंत्रण सेवा (PCS) देत असून, सामान्य निर्जंतुकीकरण सेवा, जंतू आणि सूक्ष्मजंतूकरिता निर्जंतुकीकरण, वाळवी-विरोधी उपचार, उंदीर नियंत्रण, डास नियंत्रण, तण नियंत्रण, कोरोना विषाणूपासून बचावासाठी सेवा इत्यादी सेवा देखील सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन देत आहे.

सुमारे ६० वर्षांहून अधिक अनुभव असलेले सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन आपल्या विविध ग्राहकांना अखंड सेवा देत आहे. हे महामंडळ ISO ९००१:२०१५(QMS), १४००१:२०१५ (EMS) आणि ४५००१:२०१८ (OH&S) या विविध यंत्रणांतर्गत प्रमाणित असून भारतीय कीटक नियंत्रण संघटनेचे (IPCA) सक्रिय सदस्य आहे.

इंजिनिअरिंग निगडित सेवा :

ओडिशा स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन, कृभको, एनएफएल, नाफेड इत्यादी संस्थांना गोदामाशी निगडित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागार सेवा सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मर्फत देण्यात येत आहेत.

ई-कॉमर्स स्टोअरेज, अन्नधान्य साठवणूक, औद्योगिक स्टोअरेज, धोकादायक माल वाहतूक, कोल्ड स्टोअरेज इत्यादींची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कॉर्पोरेशनच्या स्वत:च्या जमिनीवर कामकाज करण्यात येत आहे.

अन्नधान्य साठवणूक करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारतात गोदामाशी निगडित पायाभूत सुविधांचे बांधकाम सीडब्ल्यूसीने करण्यास सुरुवात केली आहे.

अतिकठीण प्रदेशात पारंपरिक गोदामांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. लडाखमधील द्रास आणि झांस्कर आणि अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामधील नामसाई आणि झुन्हेबोटो येथे कामकाजास सुरुवात झाली असून, लवकरच ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

संपर्क : प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com