Hapus Management : योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर दर्जेदार हापूस आंबा उत्पादन

Mango Farming : रत्नागिरी जिल्ह्यातील निशांत सावंत हे गेल्या २३ वर्षांपासून हापूस आंबा उत्पादन घेत आहेत. त्यांच्याकडे १० एकरांवर मिळून ४५० हापूस कलमे आहेत.
Hapus
Hapus Agrowon
Published on
Updated on

शेतकरी ः निशांत केशव सावंत

गाव ः सडामिऱ्या, ता. रत्नागिरी

हापूस आंबा लागवड ः १० एकर

एकूण झाडे ः ४५० झाडे

रत्नागिरी जिल्ह्यातील निशांत सावंत हे गेल्या २३ वर्षांपासून हापूस आंबा उत्पादन घेत आहेत. त्यांच्याकडे १० एकरांवर मिळून ४५० हापूस कलमे आहेत. हापूस आंब्याच्या विक्रीसाठी त्यांनी ‘कोकण रत्ना मँगो’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

ब्रॅण्ड अंतर्गत फळविक्रीतून अल्पावधीत पुण्या-मुंबईमधील असंख्य ग्राहक त्यांना थेट जोडले गेले आहेत. आंबा बागेत योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर दर्जेदार आंबा उत्पादन ते घेत आहेत. दरवर्षी साधारण मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान हंगामास सुरुवात होते. हंगाम संपल्यानंतर लगेच जून महिन्यापासूनच बागेत पुढील हंगामाची तयारी सुरू केली जाते.

Hapus
Karnataka Hapus : कर्नाटकी आंबा ‘हापूस’ म्हणून विकणाऱ्यांना समज

घन पद्धतीने लागवड

निशांत यांनी २००५ मध्ये हापूसच्या एक वर्ष वयाच्या ७० कलमांची घन पद्धतीने लागवड केली आहे. कलम लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे काढून घेतले. कातळावरील जमीन असल्यामुळे खड्डे काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली. लागवडीपूर्वी खड्ड्यांमध्ये कुजलेले शेणखत टाकून घेतले. तसेच वाळवी लागू नये म्हणून शिफारशीत रासायनिक कीटकनाशक टाकले.

दोन झाडांमध्ये साधारण ८ ते १० फूट इतके अंतर राखले आहे. लागवडीपासून साधारण सहा ते सात वर्षे नियमितपणे पाणी आणि खत व्यवस्थापनावर भर दिला. त्यामुळे नवीन कलमांपासून चांगले आणि दर्जेदार आंबा उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली.

या वर्षीचे नियोजन

 या वर्षी साधारण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हंगाम सुरू झाला. कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फळ काढणीचे नियोजन दरवर्षी केले जाते. फळे १४ आणे म्हणजेच नव्वद टक्के तयार झालेल्या फळांची काढणी केली. फळे पूर्ण तयार झाल्यानंतर काढल्यास, त्यात साका होण्याची शक्यता असते. फळे काढण्यासाठी झेल्याचा वापर केला जातो.

Hapus
Hapus Mango market : रत्नागिरीत कर्नाटकी आंबा विक्रेत्यांना बागायतदारांची तंबी

 सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावरच फळांची काढणी करण्यावर भर देण्यात आला. काढलेली फळे लगेच सावलीमध्ये ठेवण्यात आली. काढणीपश्‍चात फळांची कमीत कमी हाताळणी करण्यावर भर दिला जातो.

फळांना बुरशी लागू नये तसेच देठाकडेस फळकुज होऊ नये यासाठी फळांचे शिफारशीत बुरशीनाशकांमध्ये डीपिंग केले जाते. त्यानंतर फळे सुकवून वजनानुसार त्यांची प्रतवारी केली जाते.

प्रतवारीनंतर ५ ते ९ डझन प्रति पेटी याप्रमाणे लाकडी पेट्ट्यांमध्ये आंबे भरून विक्रीसाठी पाठविली जातात. दरवर्षी सरासरी दीड हजार हापूस आंबा पेट्यांची विक्री होते. पुणे आणि मुंबई येथील ग्राहकांना ‘कोकण रत्न मँगो’ या ब्रॅण्ड अंतर्गत पेट्या पाठविल्या जातात. प्रति पेटी सरासरी १५०० ते २००० रुपये इतका दर मिळतो, असे निशांत सावंत सांगतात.

आगामी नियोजन

यंदा पाऊस उशिराने सुरू झाल्यामुळे बागेतील कामांचे वेळापत्रकदेखील लांबले आहे. बऱ्यापैकी चांगला पाऊस झाल्यानंतर कलमांना खतमात्रा देण्यास सुरुवात केली जाईल. प्रामुख्याने युरिया, फॉस्फेट, पोटॅश यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा आणि ह्युमिक ॲसिड एकत्रित करून दिले जाईल. ही मात्रा लहान कलमांना प्रत्येकी ३ ते ४ किलो आणि मोठ्या कलमांना ८ ते १० किलो याप्रमाणे दिली जाईल. या वर्षी लेंडी खताचा देखील वापर केला जाणार आहे. कलमांच्या बुंध्यात आळे करून संपूर्ण खतमात्रा दिली जाते.

Hapus
Hapus Mango : देवगडच्या नासीर सोलकरांनी दिली हापूस आंब्याला राम्बुतानची साथ

 जुलैच्या मध्यात बागेची साफसफाई केली जाईल. पावसामुळे फळबागेत तणांचा प्रादुर्भाव वाढतो. कलमांवर तणांच्या काही वेली चढतात. अशा वेली काढून टाकल्या जातीत. तसेच कलमांवर वाढलेली बांडगुळे काढून टाकली जातील.

 ऑगस्टच्या सुरुवातीस कलमांच्या वयानुसार योग्य प्रमाण ठरवून पॅक्लोब्युट्रोझोलचा वापर करण्यात येईल. यामुळे झाडांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. वापर करण्यापूर्वी बुंध्यावरील तण काढून घेतली जातीत. जेणेकरून झाडांना पॅक्‍लोब्युट्राझोलचा पुरेसा फायदा होईल.

 साधारणतः दसऱ्याच्या दरम्यान पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. या काळात पावसामुळे बागेत तणदेखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले असते. वाढलेले तण ग्रासकटरने कापून बागेची स्वच्छता केली जाईल.

 ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हवामान बदलामुळे बागेत कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार शिफारशीत कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या फवारण्यांचे नियोजन केले जाईल.

- निशांत केशव सावंत, ९४०३०१२३४५, (शब्दांकन ः राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com