Organic Cotton : सेंद्रिय कापसाला पूर्व विदर्भात प्रोत्साहन

Cotton Cultivation : चंद्रपूर जिल्ह्याची कापसाची उत्पादकता जेमतेम आहे. त्यातच जिल्ह्याच्या सीमा या तेलंगणा राज्याशी जुळलेल्या असल्याने त्या भागातून अनधिकृत बियाण्याचा पुरवठा होत त्याची देखील लागवड होते.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : कापसाची उत्पादकता वाढ त्यासोबतच सेंद्रिय कापूस उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने खासगी सार्वजनिक भागीदारीतून कापसासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यात केली जात आहे.

याकरिता खासगी कंपन्यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असून यंदा प्रकल्पाचे दुसरे वर्ष असेल, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्याची कापसाची उत्पादकता जेमतेम आहे. त्यातच जिल्ह्याच्या सीमा या तेलंगणा राज्याशी जुळलेल्या असल्याने त्या भागातून अनधिकृत बियाण्याचा पुरवठा होत त्याची देखील लागवड होते.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

त्यावर नियंत्रणासोबतच सेंद्रिय कापूस उत्पादनाला चालना मिळावी या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या एकार्जुना येथील संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून सेंद्रिय कापूस प्रकल्प राबविला जात आहे. याकरिता खनिज विकास निधी त्यासोबतच इंडोकाऊंट इंडिया प्रा. लि. या दोन्ही यंत्रणांकडून प्रत्येकी १ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी सामाजिक दायित्व अंतर्गत मिळाला आहे.

त्याकरिता कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विशेष पुढाकार घेतला. या निधीतून शेतकऱ्यांच्या शेतावर कापूस लागवडीकरिता आवश्‍यक निविष्ठांचा पुरवठा, शेतकऱ्यांसह कृषी विभागातील कर्मचारी, अधिकारी यांचे प्रशिक्षण व इतर धोरणात्मक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : उत्पादकता वाढीसाठी केंद्र सरकारकडून अतिसघन कापूस लागवडीवर भर

२३ कापूस वाणांची लागवड गेल्या हंगामात करण्यात आली होती. त्यामध्ये १८ बिटी तर ७ नॉन बिटी वाण आहेत. यामध्ये बिटीची एकरी उत्पादकता ७ ते ८ क्‍विंटल इतकी अत्यल्प असताना नॉन बिटी वाणांपासून मात्र पावणेदहा क्‍विंटलचा उतारा प्रकल्पाच्या पहिल्याचवर्षी मिळाल्याचे डॉ. अमरशेट्टीवार यांनी सांगितले.

काय आहे प्रकल्पात

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान हे १००० मिलिमीटर आहे. त्यामुळे या भागात ड्रिपवर कपाशी घेतली जात नाही. त्याकरिता देखील या प्रकल्पातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यासोबतच रुंद सरी वरंब्यावरही लागवड, ड्रिपव्दारे फर्टीगेशन, शेंडा खुडणी, पाण्याचे बाष्पीभवन व तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मल्चींगवरील लागवड केली जाते. २५ शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक एकरावर हा प्रकल्प राबविला जात आहे.

पूर्व विदर्भात प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. त्याकरिता खासगी कंपन्या, संस्थांच्या सामाजिक दायित्व निधीचा उपयोग केला जातो. त्यातून शेतीक्षेत्रात सकारात्मक बदल होत असल्याचा अनुभव आहे. सेंद्रिय कापसाला प्रिमियम व्हॅल्यू तसेच बोनसही मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होत त्यांचे आर्थिक संरक्षणही साधले जाते.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com