Sericulture : दोन हजारांवर गावांत रेशीम शेतीचा विस्तार

Mulberry Cultivation : १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षाकरिता रेशीम संचालनालयाला ४ हजार २२५ टन कोष उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते.
Sericulture
SericultureAgrowon

Nagpur News : ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा मोठा आधार आहे. त्यामुळेच तुती लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ नोंदविली जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात २ हजार ४०९ गावांमध्ये ४ हजार ९०२.६९ टन कोष उत्पादन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी दिली.

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षाकरिता रेशीम संचालनालयाला ४ हजार २२५ टन कोष उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. याउलट रेशीम संचलनालयाने ११६ टक्‍के उद्दिष्टपूर्ती करीत ४ हजार ९०२.६९ टन कोष उत्पादनाचा पल्ला गाठला आहे.

Sericulture
Sericulture : टसर रेशीम शेती नावीन्यपूर्ण शाश्वत उद्योग

राज्यात २ हजार ४०९ गावांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात १८ हजार ६०७ एकरांवर तुती लागवड करण्यात आली. त्या माध्यमातून ७५५ टन सूत उत्पादनही शक्‍य झाले आहे. राज्याला ६५० टन सूत उत्पादनाचे लक्ष्यांक होते. यासह ६६ लाख रोजगार निर्मितीचा उद्देश असताना प्रत्यक्षात ८२.९३ लाख रोजगार निर्मिती झाली आहे.

अमरावती विभाग लागवड (एकर), उत्पादन (टन)

अमरावती...३९१...३१.८६

यवतमाळ...६४१...१२७.२१

वाशीम...११३...१४.८८

बुलडाणा...३९५...१६१.८९

अकोला...५९१...६१.१९

एकूण...२१३१...३९७.०५

गावे...४१४

Sericulture
Sericulture : रेशीम कोश उत्पादकांची कसरत सुरू

नागपूर विभाग लागवड (एकर), उत्पादन (टन)

वर्धा...३०१...३५.७४

चंद्रपूर...२८...२.५४

नागपूर...१९९...२३.३४

भंडारा...५३.५०...३.२२

गोंदिया...४२...१८

गावे ः १३३

छत्रपती संभाजीनगर विभाग लागवड (एकर), उत्पादन (टन)

छत्रपती संभाजी नगर ः ७६३ ः १७१.४४ टन

जालना १०८८ ः २४७.८९

परभणी ः ५८५ ः १६७.२२

हिंगोली ः ३८४ ः ६१.०६

नांदेड ः ४६४ ः ८४.८९

लातूर ः ५७४ः ११७.७३

धाराशिव ः १४८८ ः ६६४.५९

बीड ः ४७३७ ः १२१६.४८

एकूण लागवड ः १० हजार ८३ ः ७३१.२८

गावे ः १०६५

पुणे विभाग लागवड (एकर), उत्पादन (टन)

पुणे ः ९७६ ः ३३८.३२

सांगली ः ४७२ ः १०९.७८

सातारा ः ८०७.५० ः २०७६.०२

सोलापूर ः १०९१ ः ३१७.७४

कोल्हापूर ः ८३५ ः २२६.६६

नगर ः ७७८.७५ ः १८१.१५

नाशिक ः ३१२ ः ८७.४९

धुळे ः १३ ः २.२५

नंदूरबार ः ६० ः ८.३७

जळगाव ः ४१२ ः १२८.००

ठाणे ः ७८ ः २५.२४

सिंधुदुर्ग ः ३३ ः ७.१८

२०२२-२३ या वर्षात ३ हजार ९०० टन कोष निर्मिती झाली आहे. या वर्षी चार हजार ९०२ टनांचा पल्ला गाठता आला. त्यामुळेच राज्य अपारंपरिक कोष उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकांचे ठरले आले. ५९.२४ लाख अंडीपुंज व चॉकी वापर गेल्या वर्षी तर या वर्षी ७०.९७ लाख अंडीपुंज व चॉकी वापर करण्यात आला आहे.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com