Parbhani News: राज्य सहकारी पणन महासंघाअंतर्गत (मार्केटिंग फेडरेशन) परभणी व हिंगोली या जिल्ह्यांतील १६ केंद्रांवर शुक्रवारपर्यंत (ता. ५) हमीभावाने (प्रति क्विंटल ५३२८ रुपये) सोयाबीन विक्रीसाठी २१ हजार २३१ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. शुक्रवारपर्यंत या दोन जिल्ह्यांतील १४ केंद्रांवर १ हजार ९१५ शेतकऱ्यांकडून ३३ हजार ६२१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली..परभणी जिल्ह्यातील ४ खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री केलेल्या ८० शेतकऱ्यांना ६० लाख रुपये एवढ्या रक्कमेचे चुकारे अदा करण्यात आले परंतु इतर केंद्रांवर खरेदी केलेल्या सोयाबीनचे चुकारे प्रलंबित आहेत.परभणी जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) यांच्यातर्फे परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ६ तालुक्यांत ९ खरेदी केंद्रांवर शुक्रवारपर्यंत (ता. ५) १० हजार २४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली..त्यापैकी २ हजार १४८ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीस घेऊन येण्यासाठी संदेश पाठविण्यात आले.त्यापैकी ७ केंद्रांवर ५४८ शेतकऱ्यांच्या ८ हजार ९४२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्यापैकी १ हजार ८३० क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आले. झरी आणि पाथरी केंद्रावर खरेदी सुरू झालेली नाही. .Soybean MSP Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी प्रशासन सज्ज.हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांच्यातर्फे हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या ४ तालुक्यांत ७ खरेदी केंद्रांवर शुक्रवारपर्यंत १० हजार ९८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.त्यापैकी ३ हजार ४५९ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीस घेऊन येण्यासाठी संदेश पाठविण्यात आले. .Soybean MSP: हमीभाव केंद्रांवरील खरेदीला सोयाबीन ओलाव्याचा अडसर.सर्व ७ केंद्रांवर १ हजार ३६७ शेतकऱ्यांचे २४ हजार ६७९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्यापैकी ४ हजार ६४५ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आले..६० लाख रुपये चुकारे अदापरभणी जिल्ह्यात खरेदी केलेल्या सोयाबीनची किंमत ४ कोटी ७६ लाख ४५ हजार ६४० रुपये तर हिंगोली जिल्ह्यात खरेदी केलेल्या सोयाबीनची किंमत १३ कोटी १४ लाख ८९ हजार ७१२ रुपये होते. शुक्रवारपर्यंत परभणीतील परभणी, जिंतूर, बोरी, सोनपेठ या ४ केंद्रांवर खरेदी केलेल्यापैकी १ हजार १२६.५० क्विंटल सोयाबीनचे ८० शेतकऱ्यांना ६० लाख १ हजार ९९२ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले, असे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.