Drinking Water for Livestock : पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करा

IAS Dilip Swami : पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.
IAS Dilip Swami
IAS Dilip Swami Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये, असे आदेश जिल्हाप्रशासनाने जारी केले आहेत. त्याआदेशानुसार जिल्ह्यातील चारा बाहेर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

IAS Dilip Swami
Land Dispute : जुनी खरेदी; परंतु मालकच सापडेना

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी बैठक घेऊन टंचाईचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,

उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. पी. झोड, भूजल सर्व्हेक्षणचे जीवन बेडवाल, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, साह. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रामदास इंगळे, पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डी. के. बिडेब, तहसीलदार पल्लवी लिगदे आदी उपस्थित होते.

IAS Dilip Swami
Tembhu Irrigation Scheme : ऐन दुष्काळी परिस्थितीत सांगोलाकरांना दिलासा; माण नदी खळखळली 

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्वप्रथम पाणीटंचाई संदर्भात आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहीत विहीरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतूदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे निर्देश यावेळी श्री. स्वामी यांनी दिले.

चारा उपलब्धतेबाबत माहिती घेतली. चारा उपलब्धतेबाबत पशुसंवर्धन विभागाने खात्री करावी व जिल्ह्यात सर्वत्र समान पद्धतीने चारा उपलब्ध होईल या पद्धतीने नियोजन करावे. त्यासाठी समान तत्त्वांवर पशुधनाच्या संख्येनुसार चारा उपलब्ध करुन देण्याबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. तसेच चारा उपलब्धतेबाबत तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात यावा असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com