Tembhu Irrigation Scheme
Tembhu Irrigation SchemeAgrowon

Tembhu Irrigation Scheme : ऐन दुष्काळी परिस्थितीत सांगोलाकरांना दिलासा; माण नदी खळखळली 

Agriculture Irrigation : राज्याच्या अनेक भागातील धरणातील उपयुक्त पाणीसाठा घटत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पाण्याच्या एका घंड्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
Published on

Pune News : राज्यात ऐन उन्हाळ्यात अनेक धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात घट झाली आहे. यामुळे विविध जिल्ह्यांना पाणीबाणीला सामोरे जावं लागत आहे. यादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील भीमा (उजनी) धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यावर आल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून सांगोला तालुक्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र टेंभू योजनेतून माणगंगा नदीला कृष्णा नदीचे पाणी पोहचले. यामुळे तालुक्याला बसणाऱ्या दुष्काळ्याच्या झळांपासून दिलासा मिळाला आहे. 

सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती

यंदा राज्यातील १६६५ गावे आणि ३९९९ वाड्यावस्त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्यात २०९३ टँकरेने पाणीपुरवठा सुरू असून सोलापूर जिल्ह्यात ५७ गावांसह ४६९ वाड्यावस्त्यांवर ६३ टँकरेने पाणीपुरवठा केला जात आहे. यादरम्यान सांगोला तालुक्यातील माणगंगा नदीत पाणी घटल्याने अनेक ठिकाणी शेतीचा प्रश्न निर्माण झाला. पाचेगाव, जुनोनी, हातीद, मंगेवाडी, राजुरी जुजारपूर, हटकर या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सांगोल्यातील जनतेने आणि शेतकऱ्यांनी टेंभू योजनेतून पाण्याची मागणी केली होती. 

Tembhu Irrigation Scheme
Tembhu Irrigation : ‘टेंभू’मुळे ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

टेंभूचे आवर्तन  

या मागणीप्रमाणे दुष्काळी पट्ट्यातील सांगोला तालुक्याला आता टेंभूचे पाणी मिळाले आहे. टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्यांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून पाणी रविवारी (ता.१४) दुपारपर्यंत बलवडी बंधाऱ्यात दाखल झाले. यामुळे पुढील १० दिवसांत माण नदीवर असणारे मेथवडेपर्यंतचे सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी भरेल. 

Tembhu Irrigation Scheme
Tembhu Irrigation Scheme : मार्चअखेर टेंभूचे पाणी सोडणार माण नदीत

फळबागांना जीवदान

सोलापूरसह राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे.  अनेक जिल्ह्यात पारा ३८ अंशांपेक्षा जास्त असून यात पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यातच सांगोला तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने फळबागा पाण्याअभावी जळून चालल्या होत्या. पण आता टेंभूचे पाणी मिळाल्याने फळबागांना जीवदान मिळाले आहे. 

सांगोला तालुक्यातील ३२ गावांना लाभ  

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून टेंभूचे पाणी सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांना सोंडले जाते. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील सात तालुक्यातील २१३ गावातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील ३२ गावांना टेंभू योजनेचा लाभ मिळत असून येथील २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यामुळे या येथील माळरानावर हिरवीगार शेती आणि फळबागा दिसत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com