Narendra Modi : मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांना आंदोलकांची धास्ती

Narendra Modi On Nashik Your : शेतकरी, कष्टकरी, वाहनचालक, अंगणवाडी सेविका अशा विविध घटकांचे विविध प्रश्‍न ऐरणीवर आहेत. त्यामुळे कुठे संप, तर कुठे आंदोलन, मोर्चे सुरू आहेत.
Narendra Modi In Nashik
Narendra Modi In NashikAgrowon

Nashik News : जिल्ह्यात शेतकरी, कष्टकरी, वाहनचालक, अंगणवाडी सेविका अशा विविध घटकांचे विविध प्रश्‍न ऐरणीवर आहेत. त्यामुळे कुठे संप, तर कुठे आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक शहरात होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‍घाटनासाठी येत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आंदोलक, कांदा उत्पादक निदर्शने, आंदोलन करण्याची शक्यता आहे. याची धास्ती पोलिस यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेत अनेक आंदोलकांना ‘कलम १४९’ अन्वये प्रतिबंधक नोटिसा दिल्या जात आहेत.

एकीकडे कांदा निर्यातबंदीमुळे गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर सातत्याने टीका केली जात आहे. तर दुसरीकडे बेरोजगारी, कामगार धोरणांमुळेही समाजातील काही घटकांमध्ये नाराजी आहे.

Narendra Modi In Nashik
Narendra Modi : सुरक्षित, समृद्ध, सामर्थ्यशाली देश म्हणून भारताची ओळख

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने कांदा निर्यात बंदी उठविल्याशिवाय मोदी यांनी नाशिकला येऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वी निर्यातबंदी मागे न घेतल्यास कांदे फेकू, असा इशारा दिला आहे.

Narendra Modi In Nashik
Onion Export Ban : ...तर मोदींच्या नाशिक दौऱ्याचा निषेध करावा

तसेच कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास नाशिकच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणार, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे पंचवटी परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. काही आंदोलकांच्या हालचालींवर पोलिसांकडून करडी नजरही ठेवली जात आहे.

विशेष पथके शहरात

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्तवार्ता विभागाची पथके शहरात दाखल झाली आहेत. या पथकांकडून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कार्यक्रमस्थळांसह आसपासच्या परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे. शहरातील हॉटेल्स, लॉजेस् या ठिकाणी आलेल्यांची चौकशी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com