Narendra Modi : सुरक्षित, समृद्ध, सामर्थ्यशाली देश म्हणून भारताची ओळख

Indian Navy Day 2023 : गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून भारत सुरक्षित, समृद्ध आणि सामर्थ्यशाली देश म्हणून जगात ओळखला जाऊ लागला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून भारत सुरक्षित, समृद्ध आणि सामर्थ्यशाली देश म्हणून जगात ओळखला जाऊ लागला आहे. यामध्ये नौसेनेचा सिंहाचा वाटा आहे. देशाने ज्ञान, विज्ञान, कला, सस्कृतीसोबतच आर्थिक प्रगतीदेखील साधली असून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आपण आलो आहोत. येत्या काही वर्षांत भारत तिसऱ्या स्थानावर असणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सोमवारी (ता. ४) केले.

राजकोट बंदर (ता.मालवण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यानंतर तारकर्ली येथे नौसेना दिन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरक्षंणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ॲडमिरल आर. हरिकुमार आदी उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Agriculture Management : काळ्या आईने संपन्नतेसह दिले समाधानही

पंतप्रधान मोदी म्हणाले, की नौदलाच्या जन्म ज्या भुमित झाला. त्याच भुमित आज नौसेना दिन साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर नियत्रंणाचे महत्त्व ओळखून समुद्र तटबंदीवर लक्ष केंद्रीत केले होते. भारत सरकारने गेल्या नऊ-दहा वर्षांत नौदल अधिक सक्षम बनण्यासाठी पूर्ण लक्ष दिले असून ‘मेड इन इंडिया’चे विक्रांत हे एक उत्तम उदाहरण आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Agriculture GI : महाराष्ट्रातील नऊ उत्पादनांना ‘जीआय’

सागरमाला, मेरीटाईमच्या माध्यमातून समुद्री सुरक्षेवर काम केले जात आहे. जगात भारताकडे विश्वमित्र म्हणून पाहिले जात आहे. ते म्हणाले, की समुद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहीजे. समुद्र ही मोठी सपंत्ती आहे. त्यामुळे मच्छीमार आणि मत्स्यविभागासाठी स्वतंत्र मंत्रालय आम्ही तयार केले.

मच्छीमारांसाठी कोट्यवधी रुपयांच्या विविध योजना आम्ही सुरू केल्या आहेत. येथील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी नवीन योजना बनविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित सर्व मान्यवरांनी नौसेना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com