Onion Export Ban : ...तर मोदींच्या नाशिक दौऱ्याचा निषेध करावा

Naredra Modi On Nashik Tour : कांदा निर्यातबंदी करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करून मोदी नाशिकला येणार असतील तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे, असे मत घनवट यांनी व्यक्त केले आहे.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

Nagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) नाशिकला येणार आहेत. कांदा निर्यातबंदी करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करून मोदी नाशिकला येणार असतील तर कांदा उत्पादकांनी आपली नाराजी व्यक्त करावी,’’ असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

घनवट यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकमध्ये येत आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यात मोदींनी जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील, असे आश्वासन दिले होते.

Narendra Modi
Onion Market : संपाचा फटका; सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद

मात्र त्यानंतर अनेक वेळा निर्यातबंदी, साठ्यावर मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे भाव पाडले आहेत. परिणामी कांदा उत्पादक कंगाल, कर्जबाजारी झाला आहे.

आता सध्या ३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. तरी मोदी नाशिकला येण्याची हिंम्मत करतात म्हणजे कांदा उत्पादक अन्याय सहन करतात, असा त्यांना विश्वास आहे.

Narendra Modi
Onion Arrival : नगरला कांद्याची विक्रमी १ लाख गोणी आवक

नाशिक जिल्ह्यातील इतर महत्त्वाची पिके ऊस आणि भात आहेत. या पिका पासून तयार होणारी साखर व तांदूळ यावर सुद्धा निर्यातबंदी आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे.

१२ तारखेपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी हटविली नाही तर मोदींच्या रॅलीला व सभेला लोकशाही मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास निर्यातबंदी विरोधात अजिबात असंतोष नाही व शेतकऱ्यांना मिळणारे कांद्याचे दर मान्य आहेत, असे समजले जाईल, असे घनवट यांनी नमूद केले आहे.

‘...तर मोदींच्या नाशिक दौऱ्याचा निषेध करा’

आतापासूनच समाज माध्यमांवर निर्यातबंदी उठविण्याची मागणी करणारे संदेश व्हायरल होत राहिले तर भाजप नेते व सरकारपर्यंत आपला निरोप पोहोचेल व निर्यातबंदी उठेल. विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिला, तसे निर्यातबंदी नाही उठली तर ‘मोदी गो बॅक’, ‘मोदी चले जाव’ अशा घोषणा देत मोदींचा निषेध करावा, असे आवाहन घनवट यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com