Farmer Protest: संभाजीनगरमध्ये टाळ-मृदंगासह शेतकऱ्यांचे आंदोलन; पीकविमा मिळालाच पाहिजे!

Agricultural Compensation Demand: छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा परताव्यासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात आंदोलन केले. अनेक गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला साद घातली. विमा परतावा लवकर मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: खरीप पीकविम्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुकसह इतर गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २१) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदंगाच्या गजरात आंदोलन करीत खरीप २०२४ चा पीकविमा मिळावा यासाठी कृषीच्या प्रशासनाला साद घातली.

या आंदोलनात, आडगाव बुद्रुकसह भालगाव, परदरी, परदरी तांडा, टोणगाव, मुरूमखेडा आदी गावांतील शेतकरी सहभागी झाले. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्याला खरीप २०२४ चा पीकविमा मिळाला नाही.

Farmer Protest
Crop Insurance: पीकविम्याची ७०५ कोटींची अग्रिम भरपाई मंजूर, तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा!

यासंदर्भात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी कृषी विभागाकडे निवेदन सादर केले होते. त्यानुसार त्यावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत तर २१ मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदंग वाजवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावरही कारवाई न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठून टाळ-मृदंग वाजवून आंदोलन केले.

Farmer Protest
Farmer Protest: शेतकरी आंदोलनाला धक्का! पंजाब पोलिसांची कठोर कारवाई

या वेळी कृषी उपसंचालक दीपक गवळी यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शासनाचा विमा परताव्यातील वाटा न मिळाल्याने विमा परताव्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली.

कृषी उपसंचालक श्री. गवळी यांनी शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळावा यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. ३१ मार्चपर्यंत विमा परतावा खात्यावर देण्याविषयी या वेळी आश्‍वस्त करण्यात आले. परतावा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी जगदीश डवले यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com