
Dhule News : राज्य परिवहन महामंडळाच्या बस भाडेवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी (ता. २८) धुळ्यात चक्काजाम आंदोलन केले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचे धोरण व परिवहन मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाडेवाढ करून महायुती सरकारने सर्वसामान्य प्रवाशांच्या गळचेपीला एकप्रकारे सुरुवात केली आहे. एसटीची भाडेवाढ हा महायुती सरकारचा खासगीकरणाचा डाव आहे का, असा सवालही या वेळी करण्यात आला.
आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करणे हे एसटी महामंडळाचे प्रथम कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष करून महामंडळाने प्रवास भाडे वाढविले. याचा शिवसेनेने विरोध केला असून, भाडेवाढीविरोधात मंगळवारी (ता. २८) राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. धुळे बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, प्रा. शरद पाटील, अनिल गोटे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
खासगीकरणाचा डाव
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था गेल्या अनेक वर्षापासून उकिरड्यासारखी झाली असून, याला बसस्थानक म्हणावे की कचरा डेपो अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. धुळे जिल्ह्यातील सर्वच एसटी डेपोची दुरवस्था आहे. या सर्व एसटी डेपोचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात बसची स्थिती सारखीच असून प्रवाशांसाठी नव्या बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांचेही अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्याऐवजी राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या प्रवासी दरवाढीला मंजुरी देत एकप्रकारे एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव रचला आहे, असा आरोपही करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.