
Maharashtra ST Bus : राज्य परिवहन विभागाकडून २४ जानेवारीपासून एसटीची भाडेवाढ केली. याविरोधात ठाकरे गटाकडून सोमवार (ता.२७) जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून राज्यभरात हे आंदोलन करण्यात आलं. सकाळी ११ वाजता अंबादास दानवेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, "सर्वसामान्य माणसाची एसटी असते. याच्यावर तब्बल १५ टक्के भाडेवाढ आता सरकारने केलेली आहे. आश्चर्य सरकारच्या या खात्याच्या मंत्रालयात भाडेवाढीविषयी कोणतीही जाणीव नाही. म्हणून, मराठवाड्यातील सगळे तालुक्यातील बस स्थानकात भाडेवाढ विरुद्ध चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे". असे सांगितले. संभाजीनगरच्या बस डेपो परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर या आंदोलनाची दखल घेत शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दानवे म्हणाले की, "तीन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे, एसटीची सेवा खूप चांगली सुरु आहे. अशा प्रकारची घोषणा केली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात एसटीचा २ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार आम्ही समोर आणण्याचं काम केलं. ज्या पद्धतीने खासगी बसेस चालतात. आधीची बस ४४ रुपये प्रति किलोमीटर ते ही डिझेलवर चालते. मग सरकारने 1 नवीन करार केला होता, त्यामध्ये ३५ रुपये प्रति किलोमीटर विना डिझेल, १ हजार ३१० बसेस घेतल्या जात होत्या. मात्र, त्यानंतर आम्ही आवाज उठवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रक्रिया थांबवली. याचा अर्थ एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि दुसरीकडे एसटी बस तोट्यात गेली असं सांगितलं जातं. अशा परिस्थितीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर आला आहे". असे अंबादास दानवे म्हणाले.
प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी बस) तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय झाला. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ २४ जानेपासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यामुळे लालपरीचा प्रवास महागला आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. रिक्षा आणि ट्रक्सीच्या दरात प्रतिकिलोमीटर ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.