Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी केवळ ४९ टक्के

Rabi Season : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. खरीप पाठोपाठ रब्बी हंगामालाही वातावरणाचा फटका बसत आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. खरीप पाठोपाठ रब्बी हंगामालाही वातावरणाचा फटका बसत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१.८ हेक्टर इतके आहे.

त्यापैकी ९३ हजार ६३४.१ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ही टक्केवारी ४९ इतकी आहे. दरम्यान, रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि करडईच्या पेरणीमध्ये मोठी घट झाली आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक ६६.८ टक्के पेरा ज्वारीचा झाला आहे.

जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र २१ हजार ४५३.४ हेक्टर इतके असताना प्रत्यक्ष पेरणी मात्र अवघ्या ४११ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १.९ टक्के इतकी झाली आहे. वाळवा, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव तालुक्यांत गव्हाची पेरणीच झाली नाही. तर तालुक्यांमध्ये किरकोळ पेरा झाला आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गव्हापाठोपाठ हरभरा आणि करडईच्या पेऱ्यातही मोठी घट झाली आहे.

Rabi Sowing
Marathwada Rabi Sowing : लातूर विभागात केवळ २ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी

हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २३ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पेरणी ९३७.२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ४ टक्के इतकी झाली आहे. खानापूर, वाळवा शिराळा, आटपाडी, कडेगाव तालुक्यात, हरभऱ्याचा पेरा नाही.

करडईचे सरासरी क्षेत्र ३६५.८ हेक्टर असून त्यापैकी केवळ, २ हेक्टर क्षेत्रावर ०.५ टक्के इतकी पेरणी झाली आहे. जत तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये करडईची पेरणी झालेली नसल्याची सद्यःस्थिती आहे.

मका पिकाची ४४.५ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र १८ हजार १५२ हेक्टर आहे. त्यापैकी ८०६९.८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यात मक्याचा पेरा नाही.

Rabi Sowing
Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीची ३२ टक्के पेरणी पूर्ण

रब्बी ज्वारीच्या फुले, सुचित्रा वाणांची पेरणी झाली आहे. पीक उगवण ते रोपावस्थेत आहे. या पिकांची उगवण उत्तम असून लवकर पेरणी झालेले पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. गव्हाची पेरणी सुरू असून हे पीक रोपावस्थेत आहे. याचीही उगवण चांगली आहे. मका उगवण ते रोपावस्थेत आहे. मकाची पेरणी काही ठिकाणी सुरू आहे. तर हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र अत्यल्प आहे. ओलिताची सुविधा असलेल्या ठिकाणी पेरणी पूर्ण झाली आहे.

सरासरी क्षेत्र एक लाख ९० हजार ९६१ हेक्टर

जिल्ह्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र हे एक लाख ९० हजार ९६१.८ हेक्टर इतके आहे. त्यापैकी पेरणी ९३ हजार ६३४.१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ४९ टक्के इतकी झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी सुरू असून जत, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्यांत पेरणी झाली आहे. सध्या ज्वारी पीक उगवण ते रोपावस्थेत आहे. हरभरा व गव्हाची पेरणी सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com