Directorate of Marketing : ‘पणन’च्या आदेशाला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली

APMC Committee : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या मात्र ३ पेक्षा अधिक दिवस बंद राहणार आहेत. तीनपेक्षा अधिक दिवस लिलाव बंद नको, असे आदेश पणन संचालनालयाचे आहेत.
APMC
APMC Agrowon

Nashik News : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा साठा संपत आला आहे. तर किरकोळ स्वरूपात खरीप कांद्याची आवक होत आहे. हा कांदा खराब होत असल्याने शेतकरी टप्प्याटप्प्याने विक्री करत आहेत. ऐन दिवाळीत पैशांची निकड भासत असताना जिल्ह्यातील बाजार समित्या मात्र ३ पेक्षा अधिक दिवस बंद राहणार आहेत.

तीनपेक्षा अधिक दिवस लिलाव बंद नको, असे आदेश पणन संचालनालयाचे आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे.

APMC
Drought Condition : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा ; रोहित पवारांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट

तीनपेक्षा अधिक दिवस म्हणजे काही ठिकाणी १३ दिवस कांदा लिलाव बंद राहतील. व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे आता अडचण वाढणार आहे. जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. ७) लिलाव बंद झाले असून १८ नोव्हेंबर, तर काही ठिकाणी २० नोव्हेंबरपर्यंत लिलाव बंद असणार आहेत.

APMC
Sugarcane Season : राजू शेट्टी-मुश्रीफ यांच्यात ऊसदरावरून ‘कलगीतुरा’

...असे आहेत बंद कामकाज

बाजार समिती कधीपासून कधीपर्यंत

लासलगाव ७ ते १८ नोव्हेंबर

पिंपळगाव बसवंत ९ ते १८ नोव्हेंबर

येवला ८ ते १८ नोव्हेंबर

चांदवड ९ ते २१ नोव्हेंबर

मनमाड ९ ते १८ नोव्हेंबर

सिन्नर ८ ते १९ नोव्हेंबर

कळवण ९ ते १८ नोव्हेंबर

सटाणा ९ ते १८ नोव्हेंबर

नामपूर ७ ते २० नोव्हेंबर

देवळा ८ ते २० नोव्हेंबर

उमराणे १० ते २० नोव्हेंबर

नांदगाव ९ ते १९ नोव्हेंबर

व्यापाऱ्यांनी अर्ज दिल्याने कामकाज बंद राहील. मात्र १६ नोव्हेंबरपासून कामकाज सुरू करावे, असा प्रस्ताव दिला आहे. कामकाज सुरू ठेवण्याचे प्रयत्न आहेत.
नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com