Project Leadership Award : गोविंद वैराळे यांना प्रोजेक्‍ट लीडरशिप ॲवॉर्ड

Govind Vairale : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या एचडीपीएस कापूस लागवड प्रकल्पाची महाराष्ट्रात यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल प्रकल्पाचे समन्वयक गोविंद वैराळे यांना सिटी-सीडीआरए प्रोजेक्‍ट लीडरशिप ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
Govind Vairale
Govind Vairale Agrowon

Nagpur News : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या एचडीपीएस कापूस लागवड प्रकल्पाची महाराष्ट्रात यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल प्रकल्पाचे समन्वयक गोविंद वैराळे यांना सिटी-सीडीआरए प्रोजेक्‍ट लीडरशिप ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

रतलाम (मध्य प्रदेश) येथे प्रकल्पाचा अखिल भारतीय स्तरावर आढावा घेण्यात आला. या वेळी त्यांना गौरविण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकरी १९ क्‍विंटल प्रति एकर असे सर्वोच्च कापूस उत्पादन मिळविण्यात यश आले आहे.

Govind Vairale
CCI Cotton Rate : एप्रिलपासून सीसीआय गमेचेंजर; कापूस भावाचं काय? सीसीआयच्या कापूस विक्रीच्या दराचा बाजारावर दिसेल परिणाम

केंद्र सरकारने देशांतर्गत कापूस उत्पादकता वाढीसाठी एचडीपीएस (हाय डेन्सिटी प्लॅटिंग सिस्टिम) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था या प्रकल्पाची नोडल एजन्सी असून, त्यांच्या नियंत्रणात केव्हीके, कृषी विद्यापीठ तसेच अशासकीय संस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात आला आहे.

Govind Vairale
Cotton Crop : पोषक वातावरण नाही, तरीही कापूस पीक उत्तम

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सिटी सीडीआरए (दि कॉन्फडरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाइल इंडस्ट्री) यांची नेमणूक प्रकल्पांतर्गत करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून ५७७ शेतकऱ्यांद्वारे १००१ एकर क्षेत्रावर एचडीपीएस तंत्रज्ञानाद्वारे कापूस लागवडीवर भर देण्यात आला होता.

कापूस विषयाचे अभ्यासक व सिटी सीडीआरएचे प्रकल्प समन्वयक म्हणून गोविंद वैराळे यांनी शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन केले. त्याच्याच परिणामी ५७७ शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन ९.८८ क्‍विंटल कापूस प्रति एकर आले. प्रकल्पातून सर्वोच्च कापूस उत्पादकता १९ क्‍विंटल इतकी होती. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केल्याची दखल घेत प्रकल्पाचे समन्वयक गोविंद वैराळे यांना सन्मानीत करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com