Cotton Crop : पोषक वातावरण नाही, तरीही कापूस पीक उत्तम

Cotton Production : विभागात सरासरीपेक्षा कापसाची अधिक उत्पादकता नोंदविण्यात आली आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : विभागात सरासरीपेक्षा कापसाची अधिक उत्पादकता नोंदविण्यात आली आहे. पीक कापणी प्रयोगाअंती विभागाची सरासरी उत्पादकता ४८३ किलो रुई प्रतिहेक्‍टर आली आहे. या तुलनेत राज्याची सरासरी अवघी ३०५ किलो रुई प्रति हेक्‍टर इतकी अत्यल्प आहे. त्यामुळे यंदा पीक समाधानकारक असल्याची बाब समोर आली आहे.

देशात यंदा अवकाळी तसेच मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापसाची उत्पादकता कमी होईल, अशी शक्‍यता होती. मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील स्त्रोतांचा वापर करीत गरजेच्यावेळी केलेल्या सिंचनाच्या परिणामी यंदा उत्पादकता वाढल्याचे निरीक्षण खुद्द केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने नोंदविले.

कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालातूनही याला दुजोरा मिळत आहे. कापसाचा विचार करता रूई उत्पादकतेचे प्रमाण १३.८० क्‍विंटल प्रतिहेक्‍टर तर ५.५२ क्‍विंटल प्रतिएकर आहे. देशाची सरासरी उत्पादकता ४२८ किलो रुई आहे.

Cotton
Cotton Market : कापूस भावाला कमी आवक, निर्यातीचा आधार

विदर्भात १८ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. त्यातील सर्वाधिक सुमारे पाच लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. या जिल्हयात काही भागात चिबड जमीन असल्याने पाणी साचून राहते. त्याचाही उत्पादकतेवर परिणाम होतो, असे सांगितले जाते.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा सरासरी पाऊस ९३४ मिमी आहे. याउलट कापूस पिकाला फक्त ६०० ते ७०० मिमी पाणी लागते. साधारणपणे दरमहा किमान ७५ ते १०० मिमी पावसाचे वितरणही जमिनीत ओलावा देते आणि कापूस पिकाला पोषक तत्त्वे शोषण्यास मदत करते. ऑगस्टमध्ये पावसाची कमतरता होती. त्याचा उत्पादकतेवर परिणाम अपेक्षित आहे.

Cotton
Cotton Productivity : सिंचनाच्या अभावामुळे कापूस उत्पादकतेत पिछाडी

त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने पिकाला संजीवनी दिली. लागवडीनंतर ४५ दिवसांत ७०० मिमी पैकी १५ टक्के पाऊस पडणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील १२० दिवसांत फुलोऱ्यापासून ते बोंडाच्या विकासापर्यंत ८५ टक्के पाऊस पडणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील हंगामातील अति आणि तीव्र पर्जन्यवृष्टीमुळे पूर्वी अनुभवलेल्या नुकसानीच्या तुलनेत उत्पादकतेतील वाढ काही प्रमाणात स्पष्ट केली आहे.’’

जिल्हा-किलो रुई प्रतिहेक्‍टर-कापूस प्रतिहेक्‍टर-कापूस प्रतिएकर

बुलडाणा-४३०-१२.२८-४९१

अकोला-४२४-१२.११-४८४

वाशीम-५७४-१६.४०-६५६

यवतमाळ-३९८-११.३७-४५४

अमरावती-५८७-१६.७७-४७१

‘सीटी-सिडीआरए’द्वारे १००१ एकरांवर ५७७ शेतकऱ्यांद्वारे एचडीपीएस कापूस लागवड प्रकल्प राबविण्यात आला. याव्दारे यंदा ८६४ किलो रुई प्रतिहेक्‍टर म्हणजेच ९.९० क्‍विंटल कापूस प्रति एकर अशी उत्पादकता मिळाली आहे.
- गोविंद वैराळे, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक
कोरडवाहू तसेच खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांना उत्पादकता कमी झाली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाच्या सोयी होत्या त्यांनी गरजेच्या वेळी पाणी दिले. त्यामुळे अपेक्षित उत्पादकता साधता आली.
- गणेश नानोटे, कापूस उत्पादक, निंभारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com