
Ahilyanagar News : ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन या आधुनिक तंत्रांचा उपयोग करत नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन आणि संरक्षण करणारी ही स्वामित्व योजना आहे. योजनेतून मालमत्तांचे संवर्धन, सरंक्षण होईल असे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत जमिनीची मोजणी करणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरातील ६५ लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मिळकतपत्रिकांचे वितरण करण्यात आले.
अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आदी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, की अहिल्यानगर जिल्हा नेहमीच राज्याला दिशा देणारा जिल्हा आहे. ग्रामीण भागामध्ये मालमत्तांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन अत्यंत नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्राच्या साहाय्याने नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन आणि संरक्षण यातून होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही योजना राज्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली. योजनेतून ग्रामीण समुदायाच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे.
विकसित भारत देशाचे स्वाभिमानी आणि अभिमानी नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वच्छतेची सवय अंगीकारली पाहिजे. आपले घर, गाव, तालुका व जिल्हा स्वच्छ करण्याबरोबरच आरोग्यासाठी घातक असलेल्या नशा आणणाऱ्या पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे.
जिल्ह्यात ५७ हजार मिळकतपत्रिका वाटणार
स्वामित्व योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्यात ८१ ठिकाणी ६०४ गावांतून ५७ हजार ७३१ मिळकतपत्रिकांचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. योजनेतून शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास साधण्यात येणार आहे.
ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा घरगुती तसेच शेती जमिनीचे वाद होताना दिसतात. परंतु स्वामित्व योजनेतून ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व्हेमुळे हे वाद संपुष्टात येऊन नागरिकांना त्यांच्या मिळकतीचा दाखला अत्यंत सहज व सुलभपणे मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.