
Parbhani News : स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या तंट्यांची सोडवणूक होणार आहे. मिळकत पत्रिकेमुळे आपआपसातील वाद संपुष्टात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पाललमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग यांच्यातर्फे स्वामित्व योजनेद्वारे गावातील संबंधित मिळकतधारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करत आहे. या अंतर्गत शनिवारी (ता. १८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. यानंतर मेघना बोर्डकीर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता पत्रकाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.
या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख सुनील मोरे आदी ४० लाभार्थी, परभणीतील सरपंच, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
परभणी जिल्हयातील एकूण ८५५ महसुली गावांपैकी पूर्वी नगर भूमापन झालेली ७५, नगर परिषद हद्दीतील ९, गावठाण नसलेली ५ गावे वगळून ७०८ मार्कड गावे गावठाण भूमापनासाठी घेतली आहेत. त्यापैकी ५३७ गावांचे चौकशीचे काम पूर्ण झाले असून सर्व्हे ऑफ इंडियाकडून त्यापैकी ४९१ गावांचे चौकशी नोंदवही मंजूर केली आहे.
या ४९१ गावांपैकी ४२५ गावांतील ८३ हजार २१७ मिळकतींच्या मिळकत पत्रिका तयार करून ती गावे परीक्षणास घेतली आहेत. डिसेंबर २०२५ अखेर परभणीतील १०० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भूमी अभिलेख विभागाने घेतले असल्याचे त्या म्हणाल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.