Tur Variety : तुरीमध्ये सुधारित वाणांच्या वापरातून राखली उत्पादकता

Tur Production : कायम हवामानाची प्रतिकूलता व दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील भटुंबा येथील बाळासाहेब श्‍यामराव धपाटे हे जवळपास सहा वर्षांपासून तूर उत्पादन घेत आहेत.
Tur Crop
Tur CropAgrowon
Published on
Updated on

शेतकरी : बाळासाहेब धपाटे

गाव : भटुंबा, ता. केज, जि. बीड

एकूण शेती : १० एकर

तूर क्षेत्र : १ एकर

कायम हवामानाची प्रतिकूलता व दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील भटुंबा येथील बाळासाहेब श्‍यामराव धपाटे हे जवळपास सहा वर्षांपासून तूर उत्पादन घेत आहेत. धपाटे यांची एकूण १० एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकरांवर केसर आंबा, ३ एकरांवर ऊस लागवड आणि १ एकरांत तूर लागवड आहे.

बाळासाहेब यांनी सुरुवातीला सव्वा एकरांत सुधारित तूर वाणांची लागवड केली होती. हळूहळू तूर लागवड क्षेत्रात तीन एकरांपर्यंत वाढ करीत नेली होती. या वर्षी पुन्हा एक एकरावर तुरीची लागवड केली आहे. लागवडीसाठी राहुरी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित वाणावर भर दिला.

सुधारित वाण आणून त्याची कमी क्षेत्रात लागवड करायची. जे वाण योग्य वाटेल त्याचा जास्त क्षेत्रात विस्तार करायचा. विस्तार करताना कायम क्षेत्र बदलून लागवड करण्याचे सूत्र त्यांनी अवलंबिले आहे. तूर पिकाने कमी खर्चात, कमी श्रमात चांगले उत्पन्न दिल्याचा अनुभव श्री. धपाटे व्यक्‍त करतात.

Tur Crop
Tur Pest Disease Management : तुरीवरील कीड-रोग नियंत्रण

सुधारित वाणांची निवड ः

बाळासाहेब धपाटे सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करायचे. मात्र त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. त्यासाठी त्यांनी लागवड क्षेत्र विस्ताराचा निर्णय घेतला. अंबाजोगाई येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या संपर्कात राहत होते.

तज्ज्ञांकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तुरीच्या बीडीएन ७११ या वाणाची माहिती मिळाली. या वाणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याचे त्यांनी ठरविले. दोन वर्षांनी पुन्हा बदनापूर संशोधन केंद्राने विकसित केलेल्या बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) या वाणाची लागवड केली. त्यात मागील ४ वर्षांपासून सातत्य राखले आहे.

Tur Crop
Tur Crop Management : तूरीमध्ये सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

...अशी राहिली उत्पादकता

- बाळासाहेब यांनी सहा वर्षांपूर्वी बीडीएन ७११ हे वाण आणून त्याची लागवड केली. साधारण तीन किलो बियाण्यांमधून १८ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. लागवड अडीच बाय अडीच फुटांवर केली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षे त्यांनी याच वाणामध्ये सातत्य राखले.

त्यानंतर बदनापूर संशोधन केंद्राद्वारे विकसित बीडीएन २०१३-४१ या वाणाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक किलो बियाणे आणले. एक किलो बियाणाची पाऊण एकरांत १ बाय दीड फूट अंतरावर लागवड केली. त्यामधून त्यांना १० क्‍विंटल उत्पादन मिळाले.

- बीडीएन ७११ या वाणाच्या तुलनेत बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) हे वाण योग्य वाटल्याने त्यांनी यामध्येच सातत्य राखण्याचा निर्णय घेतला. पुढे याच वाणाची अडीच एकरांत दोन तास तुरीचे व तीन तास सोयाबीन याप्रमाणे अडीच एकरांत लागवड केली. त्यामधून २८ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. गतवर्षी २ एकरांवर बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) तुरीची लागवड केली होती. त्यामधून त्यांना २४ क्‍विंटल उत्पादन मिळाले.

खत व पीक व्यवस्थापन ः

- तुरीची लागवड करण्यासाठी तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेतला जातो. लागवडीपूर्वी बियाण्यांस रासायनिक बीजप्रक्रिया केली जाते.

- सुरुवातीला खताचा बेसल डोस १२:३२:१६ एकरी एक पोते व सल्फर १० किलो प्रमाणे दिले जाते.

- पीक एक महिन्याचे झाल्यानंतर १९:१९:१९ ची फवारणी घेतली जाते. त्यानंतर १२:६१:० ची फवारणी घेतली जाते.

- फूल लागण्याच्या अवस्थेत ठिबकद्वारे ०:५२:३४ एकरी १० किलो प्रमाणे दिले जाते.

- कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यकतेनुसार नियंत्रण पद्धतींचा अवलंब केला जातो. रासायनिक कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या घेतल्या जातात.

- पिकामध्ये एकरी ७ याप्रमाणे फेरोमन ट्रॅप लावले जातात.

- मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लागवड क्षेत्रात बदल करण्यावर भर दिला जातो. नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वापर केला जातो.

पुढील नियोजन

यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने तुरीला पाणी देण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तूर पीक काढणीस येणार असल्याचे बाळासाहेब सांगतात.

- बाळासाहेब धपाटे, ९८९०१८३५४६

(शब्दांकन ः संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com