Land Conservation : उत्पादक जमीन वापराचा दर्शक

Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनाच्या कार्यक्रमांच्या मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादक जमीन वापराचा दर्शक (Cultivated Land Utilization Index, CLUI) या निकषाबाबत माहिती घेणार आहोत.
Watershed Management
Watershed ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Watershed Development and Management : कोणत्याही पाणलोट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असतात. त्यांचा वापर योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने केल्यास एकूणच केल्या गेलेल्या कामांचा अधिक आणि दीर्घकाळ फायदा मिळू शकतो.

शक्यतो शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पाणलोट क्षेत्र विकास करण्यासाठी विविध प्रकारचे जलसंधारणाचे उपचार आपण प्रस्तावित करतो. त्यानंतर प्रकल्प पूर्व व प्रकल्प पश्‍चात मूल्यमापनासाठी पुढील गणितीय सूत्राचा वापर आपण करू शकतो.

उत्पादक जमीन वापराचा दर्शक ( CLUI) =

(हे गणितीय सूत्र असे वाचले जाते. = समेशन ए आय, डी आय. त्यातील आय हे १ पासून n पर्यंत. भागिले क्षेत्रफळ (A) गुणिले ३६५ (दिवस.)

या गणितीय सूत्राचा वापर आपण पाणलोटक्षेत्र विकासाची कामे किती प्रभावीपणे झाली आहेत, याच्या मूल्यमापनासाठी करू शकतो. या सूत्राद्वारे शासनाने/ बिगर शासकीय संस्थानी केलेल्या कामाचे फलित आपण तपासू शकतो. याबाबत आपण पुढील उदाहरण तपासणार आहोत.

उदाहरणार्थ

तडसर (जि. सांगली) या गावामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्र २५१४ हेक्टर आहे. त्यापैकी ४०२ हेक्टर क्षेत्र हे डोंगर उताराचे आहे. उर्वरित उत्पादक भौगोलिक क्षेत्राची आकडेवारी (तक्ता क्र. १) प्रमाणे.

तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे २११२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली किंवा कृषी योग्य असल्याचे आपण गृहीत धरू.

वरील सूत्राप्रमाणे एकूण कृषी योग्य जमिनीपैकी खरीप ज्यामध्ये ज्वारी पिकाचे क्षेत्र १३९८ हेक्टर म्हणजेच ६६.१९ टक्के आहे. ज्वारी पिकाचा सरासरी कालखंड ११० दिवसांचा गृहीत धरला आहे.

ज्वारीचे क्षेत्र × ज्वारी तयार होण्याचा कालखंड याचा गुणाकार करून त्यास भागिले एकूण लागवडीखालचे क्षेत्र × ३६५ दिवस गृहीत धरले आहे.

Watershed Management
River Conservation : नदीसंवर्धनासाठी संवाद पदयात्रा प्रभावीपणे राबवू

अशाच प्रकारे तक्त्यातील इतर पिकांची उत्पादकता वरील गणितीय सूत्राप्रमाणे काढली आहे.

जमीन उत्पादकता दर्शकाची किंमत जास्तीत जास्त एक इतकी येते. जेवढी जास्त किंमत तेवढे जास्त गाव सुपीक किंवा शेती उत्पादक असे आपण गृहीत धरू.

वर नमूद केलेल्या उदाहरणामध्ये तडसर या गावाची एकूण उत्पादकता ०.४२ एवढी आली आहे. या सूत्राची जास्तीत जास्त किंमत १ एवढी येऊ शकते.

यावरून आपल्याला अंदाज मिळतो, की उर्वरित पडीक क्षेत्रासाठी किंवा अनुत्पादक जमिनीसाठी काही उपचार करावे लागणार आहे. त्यात मृदा संधारणासोबतच जलसाठा निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील.

पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांमुळे जलसाठ्यामध्ये निश्‍चित वाढ होते. त्यामुळे पीक पद्धती बदलते. जलसाठ्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे वर्षभरामध्ये पूर्वी घेत असलेल्या पीक पद्धतीमध्ये बदल होतो. एकाऐवजी दोन किंवा तीन प्रकारची पिके घेतली जातात.

ज्या गावात पाणलोट विकासाच्या कामे शास्त्रीय पद्धतीने पूर्ण झालेली आहेत. त्याला उत्तम नियोजनाची जोड दिली जाते. तिथे उन्हाळ्यातील चौथे पीकदेखील घेतले जाते. अन्य गावांच्या तुलनेमध्ये हिवरे बाजारसारख्या गावांमध्ये हाच फरक असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार पोटतिडकीने सांगतात.

अनेक गावांतील पीक पद्धती पाण्याच्या वाढलेल्या उपलब्धतेमुळे बदलली आहे. पर्जन्यधारीत पिकांऐवजी शेतकऱ्यांनी नगदी पिकांची लागवड केली आहे. अशाच पद्धतीचे निरीक्षण सन २००१ मध्ये नियोजन आयोग (सध्याचा निती आयोग) यांनी केले आहे. पण अधिक पाण्याचा वापर करणारी पिके आपण फार दीर्घकाळ घेऊ शकणार नाही, हे त्यांना समजावणारे कुणी नाही.

त्यामुळे आज जरी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांचा फायदा दिसत असला तरी फार दीर्घकाळ किंवा शाश्‍वत टिकणारा नाही. अशा शाश्‍वत यशोगाथा काही मर्यादित गावांमध्ये टिकून आहेत.

Watershed Management
Wasteland Development Index : पडीक जमीन विकास निर्देशांक सांगतो जमिनीचा योग्य वापर

आपल्याकडे एखादी योजना किंवा कामांचे मूल्यपापन शास्त्रीय पद्धतीने फारसे होत नाही. त्याऐवजी ही योजना कोणाच्या सत्ता काळात आली, राबवली गेली, यानुसार टीकाटिप्पणी केली जाते. उदा. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू झाला.

हा कार्यक्रम प्रभावी होता. त्यानंतर सरकार बदलले. भाजपा सरकारच्या काळात जलयुक्त शिवार हे अभियान सुरू झाले. हाही कार्यक्रम तितकाच प्रभावी होता. दोन्ही वेळी विरोधी पक्ष म्हणून परस्परांनी या कार्यक्रमांवर परस्परविरोधी टीका केली. मात्र हे कार्यक्रम शास्त्रीयदृष्ट्या योग्य की अयोग्य या मुळापर्यंत कोणीही गेले नाही.

दोन्ही कार्यक्रम नैसर्गिक साधन संपत्ती विकासाच्या दृष्टिकोनातून योग्यच होते. मात्र या कार्यक्रमांच्या मूल्यमापनासाठी तांत्रिक निकष वापरले गेले नाहीत. आपण वर उल्लेखलेला जमीन उत्पादकता वापर दर्शक हा भविष्यामध्ये मूल्यमापनाच्या प्रक्रियेसाठी वापरला गेला तर अशा कार्यक्रमाच्या यश अपयश नेमकेपणाने कळू शकेल.

अवर्षण प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये वरील नमूद गणितीय सूत्राप्रमाणे जमीन ०.८० ते ०.९०/% इतकी उत्पादक करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील याचाहीअंदाज येतो.

तक्ता क्र. १ : तडसर (जि. सांगली) गावामधील जमिनीची वर्गवारी व पिके

अ. क्र. जमिनीची वर्गवारी क्षेत्र हेक्टर

(२५१४ हे./ २११२ हे. उत्पादक जमीन) उत्पादक जमिनीसोबतची सरासरी पिकांचा सरासरी कालखंड जमीन उत्पादकता दर्शक

१. खरीप ज्वारी १३९८ ६६.१९ ११० ०.१९

२. रब्बी गहू १७८ ८.४२ १२० ०.०२

३. खरीप व रब्बी पिके २१७ १०.२७ २४० ०.०६

४. बारमाही पिके ३१९ १५.१० ३६५ ०.१५

५. एकूण २११२ १०० ०.४२

- डॉ. प्रियंका तोंडे, ९०७५८०३९१८

(प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com