Jalyukta Shiwar 2 : सांगलीतील १५४ गावांत राबवणार जलयुक्त शिवार २.० ची कामे

Jalyukta Shiwar Scheme : जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्ह्यातील १५४ गावात राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.
Jalyukt Shiwar
Jalyukt ShiwarAgrowon

Sangli News : जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्ह्यातील १५४ गावात राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नऊ तालुक्यांत ३७१० कामांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ४११ कामे ही जलयुक्तमधून केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. तर ३२९९ उर्वरित कामेही सात विभागामार्फत केली जाणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shivar : आर्ट ऑफ लिव्हिंगचा राज्य सरकारसोबत करार, जलयुक्त शिवार प्रकल्प राबविणार

राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गतच्या निकषानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १५४ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात येणारी कामे शिवार फेरीच्या माध्यमातून निश्चित करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शिवार फेरीचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर केला आहे. जलयुक्त शिवार मध्ये निवड झालेल्या गावांमध्ये ग्रामसेवक, कृषी सहायक, जलसुरक्षा रक्षक, शेतकरी, ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कामे होणार आहेत.

Jalyukt Shiwar
Eknath Shinde : ‘जलयुक्त शिवार’ लोकचळवळ बनवू

जलयुक्त शिवार अभियानात पाण्याचा ताळेबंद महत्त्वाचा असल्याने कृषी विभागाने पाण्याच्या ताळेबंद विषयीची माहिती जलसंधारण विभागाकडे सादर केली आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण, लघू पाटबंधारे, कृषी विभाग, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण, मृद व जलसंधारण आणि वन विभागामार्फत ३२९९ ही कामे पूर्ण करायची आहेत. त्यापैकी २५०० कामे सुरू आहेत. तर ४११ कामांसाठी १३ कोटींचा निधी प्राप्त झाला.

तालुकानिहाय जलयुक्त शिवार कामे दृष्टीक्षेप

तालुका कामांची संख्या

कवठेमहांकाळ ७४८

मिरज १०९

तासगाव ५४६

आटपाडी २७५

खानापूर ५९२

वाळवा ९१

शिराळा ८९

कडेगाव ४९

जत १२११

एकूण ३७१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com