Fruit, Vegetable Production : देशातील भाजीपाला, फळे उत्पादन घटले

Horticulture Production : देशातील फळे आणि भाजीपाला उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा चालू हंगामात २ लाख टनांनी कमी राहून ३ हजार ५५२ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.
Vegetable
Vegetable Agrowon

Pune News : देशातील फळे आणि भाजीपाला उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा चालू हंगामात २ लाख टनांनी कमी राहून ३ हजार ५५२ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर यंदा देशातील कांदा उत्पादन १५.५६ लाख टनांनी घटेल. तर टोमॅटो उत्पादन जवळपास दोन टक्क्यांनी यंदा वाढल्याचे सरकारने आपल्या पहिल्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने आपला २०२३-२४ च्या हंगामातील फळे आणि भाजीपाला उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज जाहीर केला आहे. तर २०२२-२३ च्या हंगामातील उत्पादनाचा अंतिम अंदाज दिला. सरकारने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, २०२२-२३ च्या हंगामात फळे आणि भाजीपाला पिके २८४ लाख हेक्टरवर होती.

तर उत्पादन ३ हजार ५५४ लाख टन झाले होते. तर चालू हंगामात २८७ लाख ७० हजार हेक्टरवर उत्पादन २ लाख टनांनी कमी होऊन ३ हजार ५५२ लाख टनांवर स्थिरावेल, असा पहिला सुधारित अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला.

Vegetable
Vegetable Farming : कारले शेतीत संपादन केली ‘मास्टरी’

गेल्या हंगामात सफरचंद, केळी, द्राक्ष, आंबा आणि कलिंगड उत्पादनात वाढ झाल्याने फळांचे एकूण उत्पादन गेल्या हंगामात वाढून १ हजार १०२ लाख टनांवर पोचले होते. तर भाजीपाल्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, रताळी आणि टोमॅटो वगळता इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे भाजीपाला (Bhajipala) उत्पादनातही ३४ लाख टनांनी वाढून २ हजार १२५ लाख टनांवर पोचले होते.

चालू हंगामात फळांचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. फळांचे उत्पादन केळी, संत्रा आणि आंबा उत्पादनात झालेल्या वाढीमुळे १ हजार १२० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर भाजीपाला उत्पादनात घट होण्याची शक्यता असून उत्पादन २ हजार ९३ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर कोबी, फ्लॉवर, भोपळा, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे.

टोमॅटो उत्पादन वाढीचा अंदाज

२०२३-२४ च्या चालू हंगामात टोमॅटोची लागवड टोमॅटोची लागवड (Tomato Production) जवळपास दोन टक्क्यांनी वाढल्याचे केंद्र सरकारच्या कृषी विभागाने म्हटले आहे. गेल्या हंगामात टोमॅटोचे उत्पादन २ हजार ४२ लाख टन झाले होते. यंदा टोमॅटो उत्पादनात ४० लाख टनांची वाढ होऊन २ हजार ८२ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Vegetable
Horticulture Cluster : देशात फलोत्पादन क्लस्टर विकास कार्यक्रमाला सुरवात

कांदा उत्पादनात मोठी घट

चालू हंगामात कांदा उत्पादनाला मोठा फटका बसल्याचे दिसते. गेल्या हंगामात कांदा उत्पादन ३०२ लाख टन झाले होते. तर यंदाच्या हंगामात कांदा उत्पादन ४८ लाख टनांनी घटण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात कांदा उत्पादन २५४ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने दिला.

यंदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादन (Onion Production) ४३ लाख ३१ हजार टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. तर कर्नाटकात जवळपास १० लाख टन, आंध्र प्रदेशात ३ लाख ५४ हजार टन आणि राजस्थानमध्ये ३ लाख १२ हजार टनाने कांदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने दिला.

बटाटा उत्पादनही घटणार

देशातील बटाटा उत्पादन (Potato Production) यंदा घटण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात देशात ६०१ लाख टन बटाटा उत्पादन झाले होते. ते यंदा ११ लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. यंदाचे उत्पादन ५९० लाख टनांवरच स्थिरावेल, असे केंद्रीय कृषी विभागाने आपल्या २०२३-२४ च्या पहिल्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com