Making Seedball : दौडणपाडा शाळेत ‘सीडबॉल’ची निर्मिती

Seedball Update : डहाणू तालुक्यातील दौडणपाडा शाळेमध्ये ‘सीडबॉल’ तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. तालुक्‍यातील दहा शाळा मिळून तब्‍बल एक लाख ‘सीड बॉल’ बनवणार आहेत.
Seedball
SeedballAgrowon

Mumbai News : डहाणू तालुक्यातील दौडणपाडा शाळेमध्ये ‘सीडबॉल’ तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. तालुक्‍यातील दहा शाळा मिळून तब्‍बल एक लाख ‘सीड बॉल’ बनवणार आहेत.

Seedball
Government ITI Division : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू होणार नव्या २७६ तुकड्या

खैर, जांभूळ, बोर, चिंच, गुंज अशा वेगवेगळ्या दहापेक्षा जास्त प्रकराच्या बिया मिळवून शेण व मातीचा वापर करून दौडणपाडा शाळेमध्ये दहा हजार ‘सीडबॉल’ तयार करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना दीपक देसले, अनिल वाकळे यांचे मार्गदर्शन लाभले. केंद्रप्रमुख सोनुसिंग पाटील, मुख्याध्यापक प्रकाश मोरे, विक्रम दळवी, आप्पा वायकर, किरण सुपेकर या शिक्षकांनी सहभाग घेतला.

शााळेला उन्हाळी सुट्टी पडल्‍यानंतर प्रत्येक मुलाला काही ‘सीडबॉल’ दिले जाणार आहेत. त्याचबरोबर बस थांबा, एसटी डेपो, रेल्वे स्‍थानक, संस्‍थांच्या कार्यालयातदेखील हे ‘सीडबॉल’ पाठवले जाणार आहेत.

Seedball
Seed Ball : कोरतड शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले सीडबाॅल

सध्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पांमध्ये झाडांचे नुकसान होत आहे. अनेक डोंगरदऱ्या उद्‌ध्वस्‍त झाल्‍या आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाले लावण्याची गरज आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्‍त केले.

पर्यावरण जागृतीचा प्रयत्‍न

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे, वृक्ष संवर्धन ही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्‍याचे शिक्षकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com