Seed Ball : कोरतड शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले सीडबाॅल

आधुनिकतेच्या युगात मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि ढासळलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत.
Seed Ball
Seed BallAgrowon
Published on
Updated on

जव्हार : आधुनिकतेच्या युगात मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि ढासळलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन (Environment Conservation) करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत.

अशातच जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा कोरतड येथील विद्यार्थ्यांनी आपली दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीडबॉल (Seed Ball) बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात परिचित नसलेल्या या सीडबॉलचे महत्त्व मोठे आहे.

Seed Ball
Onion Seed Production : धाराशिवच्या डाळे कुटुंबाने कांदा बीजोत्पादन तंत्राने वाढवला खात्रीशीर नफा

पर्यावरणाचे संवर्धन आणि जाणीव-जागृती मूल्य रुजवण्यासाठी कोरतड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या सहभागातून आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला हा उपक्रम हाती घेतला आहे. माती, सेंद्रिय खत अर्थात शेणखण व विविध प्रकारच्या बियाण्यांचे एकत्रित मिश्रण करून त्यांचे छोटे-छोटे गोळे बनवून उन्हात सकवण्यात आले आहेत. खरीप हंगामाचा पाऊस सुरू होईपर्यंत हे बॉल सुरक्षित ठेवले जातात.

Seed Ball
Onion Seed Production : कसे आहे डाळे कुटुंबाचे कांदा बीजोत्पादन तंत्र?

या उपक्रमाला कोरतड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता सहारे, सहशिक्षक प्रदीप चौधरी व बंडावार यांनी सहकार्य केले आहे.

ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातून हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला कोरतड शाळा व्यवस्थापन समितीचेसुद्धा मोलाचे सहकार्य लाभत आहे.

जूनमध्ये वन विभागाकडे सुपूर्द

योग्य प्रकारे पाऊस झाल्यानंतर ओसाड माळरानातही हे सीडबॉल पावसाळ्यात फेकले जातात. मातीमिश्रित असल्याने पावसाळ्यात सहज सीडबॉलमधील बी उगवते. या सीडबॉलमुळे रोपांच्या लागवडीसाठी खोदण्यात येणारे खड्डे खोदण्याची गरज नसते.

या अनोख्या सीडबॉलचे फलित म्हणून विद्यार्थी एक हजार सीडबॉलची निर्मिती करून ते वन विभागाकडे पेरणीसाठी जून महिन्यात देण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com