Healthy Drink : आरोग्यदायी स्वादिष्ट, पौष्टिक पेय

Immunity Increase Drink : प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी निरोगी आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, काही स्वादिष्ट आणि पौष्टिक पेय देखील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकतात.
Healthy Drink
Healthy DrinkAgrowon
Published on
Updated on

प्रिती भोसले, डॉ.विजया पवार

हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशावेळी प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी निरोगी आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, काही स्वादिष्ट आणि पौष्टिक पेय देखील प्रतिकाशक्ती वाढविण्यास मदत करू शकतात.

हळद दूध

हळद दूध हे एक पारंपरिक आयुर्वेदिक पेय आहे जे प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हळदीमधील कुरकुमिन हे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

हळद दूध बनविण्यासाठी, एक ग्लास दूध उकळवून त्यात एक चमचा हळद पावडर आणि चवीनुसार साखर मिसळावी.  हे मिश्रण चांगले मिसळून गरम असताना प्यावे.

Healthy Drink
Healthy Amla : आरोग्यदायी आवळा

आल्याचा चहा

आल्यामधील जीवनसत्त्व क आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

चहा बनविण्यासाठी एक चमचा आले बारीक चिरून एक ग्लास पाण्यात उकळवा.  पाणी उकळल्यावर,  त्यात चवीनुसार साखर मिसळावी. हा चहा गरम असताना प्यावा.

शेवग्याचा चहा

शेवग्याचा चहा हे एक चवदार आणि पौष्टिक पेय आहे. शेवग्यामध्ये असलेली प्रथिने,  जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

चहा बनविण्यासाठी, एक चमचा शेवग्याच्या बिया बारीक करून एक ग्लास पाण्यात उकळवा.  पाणी उकळल्यावर, त्यात चवीनुसार साखर घालून गरम असताना हा चहा प्यावा.

Healthy Drink
Healthy Neera : आरोग्यदायी नीरेचे फायदे

लिंबू सरबत

लिंबू पाणी हे पौष्टिक पेय आहे. लिंबामध्ये असलेले जीवनसत्त्व क हे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. एका लिंबाचा रस एक ग्लास पाण्यात मिसळावा.  चवीनुसार त्यामध्ये साखर मिसळून प्यावे.

आले-पाणी मिश्रण

आले-पाणी हे पौष्टिक पेय आहे जे प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करते.

आल्यामधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

आल्याचा एक तुकडा बारीक चिरून एक

ग्लास पाण्यात उकळवा.  पाणी उकळल्यावर, 

त्यात चवीनुसार साखर मिसळून थंड असताना प्यावे.

हिवाळ्यात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी या पेयांव्यतिरिक्त आहारात फळे, भाज्या आणि कडधान्ये असावीत. या पदार्थांमधील पोषक तत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com