Malani Adchani Ani Upay: मळणी करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय

Threshing Problems: आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर कंम्बाईन हार्वेस्टर आणि मळणी यंत्रांचा वापर करत आहेत.मात्र, मळणी करताना काही सामान्य अडचणी येतात. या अडचणींमुळं हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी सोप्या आणि योग्य उपाययोजना केल्यास या समस्या सहज टाळता येतात.
Reasons and Solutions for grain damage during threshing process.
Reasons and Solutions for grain damage during threshing process.Agrowon
Published on
Updated on

Thresher Machine Maintenance: राज्यात सध्या अनेक भागांत पिकांची मळणी सुरू आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर कंम्बाईन हार्वेस्टर आणि मळणी यंत्रांचा वापर करत आहेत. मात्र, मळणी करताना काही सामान्य अडचणी येतात. जसं दाणे व्यवस्थित वेगळं न होणं, दाणे तुटणं, धान्य भुश्याबरोबर उडणं, मळणी ड्रम जाम होणं. या अडचणींमुळं धान्याचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी सोप्या आणि योग्य उपाययोजना केल्यास या समस्या सहज टाळता येतात.

दाणे व्यवस्थित वेगळे न होणे-

मळणी करताना अनेकदा दाणे व्यवस्थित वेगळे होत नाहीत. अशावेळी सिलेंडरचा वेग थोडा वाढवावा आणि मळणी यंत्रातील ड्रम व सिलेंडरमधील अंतर कमी ठेवावे. तसेच ओले पीक मळणीसाठी टाकणे टाळावे. यामुळे मळणी व्यवस्थित होते.

Reasons and Solutions for grain damage during threshing process.
Wheat Harvesting Tips: गव्हाची काढणी, मळणी आणि साठवण करताना काय काळजी घ्याल?

दाणे तुटणे-

कधी कधी दाणे तुटण्याचे प्रमाण वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात पीक एकदम टाकणे. त्यामुळे मळणी यंत्रात पीक हळूहळू आणि समप्रमाणात टाकावे. तसेच ओल्या पिकाची मळणी टाळल्यास दाणे तुटण्याचे प्रमाण कमी होते.

धान्य भुश्याबरोबर उडणे-

धान्य भुश्याबरोबर उडून जाण्याची समस्या देखील दिसून येते. अशावेळी पंख्याची गती कमी करावी. उलट, जर धान्यामध्ये भुसा जास्त प्रमाणात राहात असेल तर पंख्याची गती वाढवावी. यासोबत चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती वाढवावी आणि पिकानुसार योग्य आकाराच्या चाळण्या वापराव्यात.

Reasons and Solutions for grain damage during threshing process.
Harvesting Tips: उत्तम टिकवणक्षमतेसाठी रब्बी पिकांची योग्य काढणी कशी करावी?

चाळणीवर दाण्याचे प्रमाण वाढणे-

कधी कधी वरच्या चाळणीवर दाणे साचतात. अशावेळी चाळणीची छिद्रे बंद झाली आहेत का ते तपासून साफ करावी. तसेच चाळणीचा उतार कमी करावा आणि योग्य आकाराच्या चाळण्या वापराव्यात.

मळणी ड्रम जाम होणे-

मळणी करताना ड्रम जाम होणे ही मोठी समस्या असू शकते. यासाठी एकदम जास्त पीक टाकणं टाळावे. यंत्रातील बेल्टचा ताण योग्य आहे का ते तपासावे. सिलेंडरचा वेग योग्य ठेवावा आणि शक्यतो कोरड्या पिकाचीच मळणी करावी. पिकात गवत किंवा इतर कचरा असल्यास तो आधी काढून टाकावा. तसेच सिलेंडर आणि ड्रममधील अंतर योग्य ठेवणेही गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com