Cotton Market : नांदेड बाजार समितीकडून कापूस खरेदी सुरू

Cotton Rate : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दरवर्षी किमान हमीदरानुसार कापूस खरेदी करण्यात येते.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Nanded News : भारतीय कपास निगम अर्थात ‘सीसीआय’ मार्फत नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कापूस हंगाम सन २०२४ मध्ये सालासर कॉटन स्पिन प्राथमिक लिमिटेड कलादगाव (ता. अर्धापूर) येथे बुधवारी (ता. १३) कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दरवर्षी किमान हमीदरानुसार कापूस खरेदी करण्यात येते. याही वर्षी अर्धापूर तालुक्यातील कलगाव येथे असलेल्या सालासर कॉटन स्पिन प्राथमिक लिमिटेड या जिनिंग प्रेसिंगवर सीसीआयच्या माध्यमातून किमान हमीदरानुसार कापसाची खरेदी होणार आहे.

Cotton Market
Cotton Market: कापसाच्या भावात वाढ होईल का ?

कापूस हंगाम सन २०२४ २५ साठी खरेदी होणाऱ्या या केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असल्याचे बाजार समिती प्रशासनाने कळविले आहे. आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदीकरिता आठ ते बारा टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारण्यात येणार आहे. नॉन एफएक्यू दर्जाचा किंवा भिजलेला कापूस पिकाला जाणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. याकरिता कापूस पीक नोंदणीचा ऑनलाइन सातबारा उतारा, आठ अ ची सत्यप्रत सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक संलग्न असलेला मोबाईल सोबत आणावा.

Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारात सुधारणेचे संकेत

कापूस विक्री करता शेतकरी उपस्थित नसेल तर त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने एका दिवसात ४० क्विंटलपेक्षा अधिक कापूस विक्रीसाठी आणल्या शेतकऱ्याचे सातबारा उतारा बाजार समिती मार्फत पडताळणी करणे आवश्यक आहे.

जर हंगामामध्ये शेतकऱ्यांचे कापूस विक्री रुपये वीस लाखापेक्षा अधिक असल्यास बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबारा उतारा पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचे संपर्क करावा, असे आवाहन प्रभारी सजीव श्री. भारसावडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com