Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना

Common Facility Center: येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने १२.२३ कोटींच्या सामाईक सुविधा केंद्राला अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे रोजगार, उत्पादन आणि निर्यात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Paithani Saree
Paithani SareeAgrowon
Published on
Updated on

Nashik News : येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यासाठी १२ कोटी २३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्रामुळे येवल्यातील पैठणी उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथे पैठणी क्लस्टर साकारण्यात आले आहे. पैठणी सामाईक सुविधा केंद्र उभारण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. काही दिवसांपूर्वी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिवांसमवेत त्यांनी या केंद्राची पाहणी करून बैठक घेतली होती. या वेळी या केंद्राला अधिक निधी मंजूर करून सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.

Paithani Saree
Textile Mill Auction: सांगली जिल्ह्यातील पाच सूतगिरण्यांचे तिसऱ्यांदा लिलाव

मंत्री भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या योजनेला १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅपेक्स समितीच्या २० व्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. यानुसार एकूण १,२२३.३६ लाख रुपयांचा प्रकल्प खर्च असून, त्यामध्ये ९७८.६८ लाख रुपये अनुदान राज्य सरकारकडून, तर उर्वरित रक्कम खासगी सहभाग आणि बँक कर्जाच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी नाशिक जिल्हा उद्योग केंद्र करणार असून देखरेख आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी उद्योग सहसंचालक नाशिक विभाग जबाबदार असणार आहेत. सामाईक सुविधा केंद्राचे रोजचे संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशन ही विशेष उद्देश वाहन करणार आहे. या प्रकल्पांतर्गत या ठिकाणी वॉर्पिंग, रेशीम वळवण्याची सुविधा, रेशीम धागा रंगवणे, वाइंडिंग, उत्पादन डिझाइनिंग केंद्र, मूल्यवर्धन केंद्र, उत्पादन चाचणी सुविधा उपलब्ध होणार आहे.

Paithani Saree
Yewala Paithni Saree : येवल्याच्या पैठणीने महिलांना दिली नवी ओळख

हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षांत विक्रीत १,०८०.६८ कोटी रुपयांवरून वाढ होऊन ती १,७२८.२० कोटी एवढी होईल. क्लस्टरच्या उत्पादकतेत ६५ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढ होईल. रोजगारात ३७८ वरून ९४९ पर्यंत वाढ होईल. नफ्यात २१६.१४ कोटींवरून ३४५.६४ कोटींपर्यंत वाढ होईल, तसेच निर्यातीत ० वरून ८-१० कोटींपर्यंत वाढीचा अंदाज आहे.

जिल्ह्यातील वस्त्रोद्योगात क्रांती

या प्रकल्पामुळे पैठणी वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर होईल. तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांनाही मदत करणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येवल्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील वस्त्रोद्योगात क्रांती होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com