PM Modi Meeting : सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २९, ३० एप्रिलला होणार सभा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील मतदार संघासाठी सोमवारी (ता. २९) आणि मंगळवारी (ता. ३०) अशा दोन सभा होणार आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Agrowon

Solapur News : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही मतदार संघासाठी सोमवारी (ता. २९) आणि मंगळवारी (ता. ३०) अशा दोन सभा होणार आहेत.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाला काँग्रेस जबाबदार

सोलापुरात सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील होम मैदानावर सभा होणार आहे. तर माळशिरसमध्ये मंगळवारी सकाळी अकरा वाजता शेतीमहामंडळाच्या मैदानावर ही सभा होईल. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे.

सोलापूर शहर मध्यसह सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा तसेच मोहोळ या विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे कॉर्नर बैठका, गाव भेटी, लाभार्थ्यांशी संवाद मतदारांच्या भेटी सुरू आहेत. सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी सातपुते यांची थेट लढत होत आहे,

PM Narendra Modi
Loksabha Election 2024 : मतविभाजनाचा फायदा कोणाला?

दुसरीकडे माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. पण इथले वजनदार नेते मोहिते पाटील गटाने भाजपवर नाराजी व्यक्त करत भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे.

तसेच मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाईकनिंबाळकर यांना आव्हान दिले आहे. या दोन्ही जागा भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या सभा या ठिकाणी आयोजिल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com