PM Narendra Modi : मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाला काँग्रेस जबाबदार

Modi's Criticism of Congress : पंतप्रधान मोदींची परभणीसह नांदेडच्या सभेत टीका.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Agrowon

Nanded / Parbhani News : काँग्रेसने दशकापासून महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबाबत दम घोटण्याचे काम केले आहे. या क्षेत्रातील दुष्काळी स्थिती, पाण्याचे संकट एका दिवसात निर्माण झाले नाही. काँग्रेसच्या वागण्यामुळे येथील शेतकरी गरीब होत गेले. उद्योगाच्या संधी हुकल्या, मराठवाड्यातील लाखो युवकांना स्थलांतर करावे लागले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

PM Narendra Modi
Nana Patole : 'मराठवाड्यातील शेतकऱ्यांबदद्ल मोदींना कोरडी चिंता' : नाना पटोले 

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर व हिंगोली लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड येथे शनिवारी (ता. २०) आयोजित प्रचारसभेत बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, की काँग्रेसने देशाच्या केलेल्या दयनीय स्थितीतून काढण्यासाठी एनडीए सरकार वचनबद्ध आहे. यासाठी राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे.

PM Narendra Modi
Prime Minister Narendra Modi :'काँग्रेस नेत्यांनी पराभव स्वीकारला'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नांदेडमधून हल्लाबोल

परभणी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.२०) परभणी येथे आयोजित महाविजय संकल्प सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान म्हणाले, ‘‘काँग्रेस ही जमीन व मूळ नसलेली वेल आहे. रझाकारी मानसिकतेमुळे मराठवाड्याचा विकास रखडला आहे.

देशाने विकासाचा फार मोठा पल्ला गाठला आहे. भारताला जगातील ३ क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी ही निवडणूक आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, उमेदवार महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे, बबनराव लोणीकर, विक्रम काळे, मोहन फड, रामप्रसाद बोर्डीकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com