Ram Mandir : राम मंदिराच्या सजावटीत हापूरच्या गुलाबांचा सुगंध; शेतकऱ्याला मिळाली तब्बल १० टनांची ऑर्डर

Flowers for Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात राम विराजमान होणार आहेत. त्याचा सोहळा सुरू झाला असून जय्यर तयारी देखील केली जात आहे. तर या सोहळ्यासाठी राम मंदिराची फुलांनी सजावट केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल १० टन फुलांची ऑर्डर एका शेतकऱ्याला देण्यात आली आहे.
Ram Mandir
Ram MandirAgrowon
Published on
Updated on

Pune News : अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या धार्मिक विधीस सुरूवात झाली आहे. तसेच २२ जानेवारीला रामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. २२ तारखेला होणाऱ्या या सोहळ्यासाठी जंगी तयारी केली जात असून मंदिर फुलांनी सजवले जाणार आहे. यासाठी तब्बल १० टन फुलांची ऑर्डर एका शेतकऱ्याला देण्यात आली आहे. हा शेतकरी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील असून तेगसिंग प्रधान असे त्याचे नाव आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत असून २२ जानेवारीला रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरू आहे. याप्रसंगी नव्या मंदिराच्या सजावटीसाठी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फुलांना पसंती देण्यात आली आहे. तर सिंभोली येथील शेतकरी तेगसिंग प्रधान यांना विविध जातींच्या सुमारे १० टन फुलांची ऑर्डर देण्यात आली आहे. ज्यात गुलाब, गुलदावरी, कंद, जिप्सोफिला, झेंडू आणि पाच-सहा प्रकारच्या गुलाबांचा समावेश आहे.

Ram Mandir
Dry Day : ‘या’ राज्यात राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याला असणार ‘ड्राय डे’

३५ वर्षांपासून फुलांची शेती

सिंभोली परिसरातील तिगरी गावात राहणारे शेतकरी तेगसिंग हे गेल्या ३५ वर्षांपासून फुलांची शेती करत आहेत. त्यांच्या शेतात विविध प्रकारच्या १२ फुलांची शेती होते. सध्या त्यांच्या शेतात सुमारे चार-पाच प्रकारचे गुलाब आणि ऑर्किड आहे. यात लाल, पिवळा, गुलाबी आणि इतर गुलाबांचा समावेश आहे. तर हे गुलाब दिल्लीच्या गाझीपूर मंडीत तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशमध्ये पाठवली जातात.

Ram Mandir
MP Sanjay Raut : '...राम तुम्हाला पावणार नाही', राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

१० टन फुलांची ऑर्डर

यावेळी १० टन फुलांची ऑर्डरवरून तेगसिंग म्हणतात की, ५०० वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. प्रभू राम आपल्या घरी परतत आहेत. अशा वेळी त्यांनी ही ऑर्डर मिळणे म्हणजे त्यांचे भाग्य आहे. तसेच त्यांना या समारंभासाठी प्रिंझेथियमचे १०० आणि ऑर्किडचे ५० बॉक्सची ऑर्डर आहेच. याशिवाय क्रांझेथिमुम, कणेरसह लाल आणि गुलाबी गुलाबांना सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

कोणती फुले लागणार राम मंदिरात

अयोध्येतील राम मंदिरच्या सजावटीसाठी हापूडच्या फुलांची ऑर्डर देण्यात आली आहे. ज्यामुळे मंदिरासह संपुर्ण परिसर सुगंधित होणार आहे. यासाठी १० टन फुलांची ऑर्डर असून त्यात प्रिंझेथियमचे १०० आणि ऑर्किडचे ५० बॉक्स, बर्ड ऑफ पॅराडाईज, अँथुरियम २० ते २५ बॉक्स याच्यासह क्रांझेथिमुम, कणेरसह लाल आणि गुलाबी गुलाबांचे ट्रक दररोज अयोध्येत जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com