Ram Mandir : श्रीराम मंदिर : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

Shri Ram Ceremony : भारतीयांच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना भव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी होत आहे.
Ram Mandir
Ram MandirAgrowon

चंपतराय बन्सल

Ram Mandir Inauguration : श्री रामाच्या मंदिरासाठी प्रदीर्घ काळ संघर्ष करावा लागला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ७ आणि ८ एप्रिल १९८४ रोजी विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसद आयोजित केली होती. तेथून श्रीराम जन्मभूमीसाठी आंदोलन सुरू झाले ते पुढे तब्बल ४० वर्षे सुरू राहिले.

त्यात बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे, अशोक सिंघल, गोपाल सिंह विशारद, विष्णुहरी दालमिया, आचार्य गिरिराज किशोर, राजमाता विजयाराजे सिंधिया, ओंकार भावे, राजेंद्र सिंह (रज्जू भय्या) के. के. नायर, गुरुदत्ता सिंह, दाऊदयाल खन्ना, देवकीनंदन अग्रवाल यांनीही वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आणि त्यातून आता मंदिर साकारत आहे.

या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त त्यात सामील झाले. त्यासाठी पोलिसांच्या गोळ्या झेलल्या, अनेकांना तुरुंगात जावे लागले, त्यांच्या हालअपेष्टा झाल्या. परंतु आंदोलन आणि आंदोलक कधीही आपल्या उद्दिष्टापासून दूर गेले नाहीत. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांनी श्रीराम मंदिराची योजना किती तरी आधीच तयार केली होती.

सगळ्या रामभक्तांनी ती मार्गी लावली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यापासून त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. न्यायालयीन संघर्ष ते मंदिर उभारणी या टप्प्यांतही जबाबदारी पार पाडता आली ती केवळ, श्रीरामामुळेच. श्रीराम मंदिर हे केवळ विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ परिवार यांचेच यश नाही, तर शिलान्यासाच्या कार्यक्रमापासून अनेक उपक्रमांत सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे यश आहे.

Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : देवी काली आणि अयोध्या मंदिर

राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या, तरी सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे त्यात योगदान होते. श्रीमराम मंदिरासाठीच्या आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला, असा आरोप काही जण करतात. परंतु आमचे आंदोलन १९८४ मध्येच सुरू झाले होते. भाजप त्यात १९८९मध्ये सहभागी झाला.

राजकीय बदल होत गेले, सरकारे आली-गेली परंतु आंदोलन, सत्याग्रह आणि जनजागरण कधी थांबले नव्हते. भाजप सत्तेवर असतानाही आमचे आंदोलन सुरूच होते. राजकीय पक्ष त्यांचे राजकारण करतात. आमचे उद्दिष्ट श्रीराम मंदिर होते आणि त्यानुसार कार्यरत असताना समाजानेही मोठी साथ दिली. आंदोलनाचा टप्पा आता पार पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तावून सुलाखून दिलेल्या निकालातून सत्य बाहेर पडले आणि श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा प्रवास सुरू झाला.

Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : लोकसहभाग आणि नियोजनबद्ध प्रयत्नांतून मंदिर

समाजाचे समर्पण..!

श्रीराम मंदिराचा आराखडा तयार झाल्यावर त्यासाठी जगभरातून सहकार्याचे हात पुढे आले. एक-दोन रुपयांपासून लोकांनी समर्पण केले. गरिबांतील गरीब व्यक्तीनेही त्यात सहभाग घेतला. श्रीराम मंदिर उभारताना अनेक आव्हानेही आली. परंतु आधुनिक तंत्रज्ञान, श्रीराम भक्त कुशल तंत्रज्ञ आणि समाजातील सात्त्विक शक्तीच्या बळावर श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे.

देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून मंदिर उभारणीसाठी हात लागले आहेत. एकीकडे मंदिर उभारणी होत असताना, त्याला साजेशा अयोध्यानगरीचेही रूप बदलत आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रिंग रोड आदी पायाभूत सुविधांमुळे जगभरातील भाविक अयोध्येकडे आकर्षित होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे योगदान आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे निरंतर प्रयत्न, यातून मंदिर निर्माण होत आहे आणि अयोध्याही एका सुंदर, सुनियोजित शहरात बदलत आहे. अयोध्येमुळे देशाच्या सांस्कृतिक वैभवात नक्कीच मोलाची भर पडणार असून राष्ट्रीय सलोख्याचे प्रतीक म्हणून जगभर या मंदिराची ओळख निर्माण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com